घरासाठी तिने 20 बॉयफ्रेंड्सकडून घेतले 20 आयफोन-7
By admin | Published: November 1, 2016 02:20 PM2016-11-01T14:20:51+5:302016-11-01T14:49:59+5:30
घराचे डाऊन पेमेंट भरण्यासाठी पहिल्यांदा तिने 20 बॉयफ्रेंड्स पटवले. त्यानंतर या 20 बॉयफ्रेंड्सकडून प्रत्येकी एक महागडा आयफोन-7 गिफ्ट देण्याची मागणी केली.
Next
ऑनलाइन लोकमत
शेंझेन, (चीन) दि. 1 - स्वतःच्या हक्काचे घर असावे, असे कुणाला वाटत नाही. स्वप्नातले घर प्रत्यक्षात साकार व्हावं, यासाठी प्रत्येक जण कर्ज काढून, कसा तरी आर्थिक डोलारा उभारतात. मात्र चीनमधील शेंझेन शहरातील एका तरुणीने घराचे हफ्ते फेडण्यासाठी चातुर्याने आगळी-वेगळी शक्कल लढवली.
शाओली असे या तरुणीचे टोपणनाव असून तिने घराचे डाऊन पेमेंट भरण्यासाठी पहिल्यांदा 20 बॉयफ्रेंड्स पटवले. त्यानंतर या 20 बॉयफ्रेंड्सकडून प्रत्येकी एक-एक महागडा आयफोन-7 गिफ्ट देण्याची मागणी केली. यानंतर तिने हे सर्व 'आयफोन्स टेक रिसायकलिंग साईट'वर प्रत्येकी 120,000 युआनला म्हणजे भारतीय चलनाप्रमाणे 11 लाख 81 हजार 217 एवढ्या किंमतीला विकले.
अशा पद्धतीने 20 'आयफोन-7' ची विक्री केल्यामुळे चीनसारख्या देशात स्वतःचं हक्काचे घर घेण्यासाठी शाओलीकडे अगदी सहजरित्या तेवढी रक्कम उपलब्ध झाली. 20 आयफोन-7 विकून तिने घराची डाऊन पेमेंट भरली. शाओलीने ही सर्व कहाणी घर प्रवेशावेळी आपल्या मित्र-मैत्रिणींना सांगितली तेव्हा काही जण आश्चर्यचकीत झाले होते. सोशल नेटवर्किंग साइट्सवर तर शाओलीची ही 'घर कहाणी' भलतीच व्हायरल झाली आहे.
दरम्यान, या घटनेवर संमिश्र अशा प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. कुणी तिच्या चातुर्याचे कौतुक करत आहेत, तर कुणी महागडा 'आयफोन 7' गिफ्ट करणा-या मुलांची फसवणूक केल्याप्रकरणी तिच्याविरोधात राग व्यक्त करत आहेत.
गेल्या काही दिवसात, चीनमध्ये सोशल मीडियावर हॅशटॅग '20 मोबाइल्स फोर अ हाऊस' (# 20 mobile for a house) या ट्रेंड अंतर्गत शाओलीची स्टोरी चांगलीच व्हायरल झाली आहे.
जिथे अनेकींना नशिबाने केवळ एक बॉयफ्रेंड मिळतो, तिथे शाओलीने तब्बल 20 बॉयफ्रेंड्स पटवले. फक्त पटवलेच नाही तर सहजासहजी न मिळणारा महागडा आयफोन्स-7 देखील त्यांच्याकडून गिफ्ट घेतला, शिवाय चतुर बुद्धीने 20 आयफोन्सची विक्री करुन स्वतःचे हक्काचे घरदेखील मिळवले.