हौथी बंडखोर फसले! समुद्रात इस्त्रायचे जहाज समजून केले अपहरण; जहाज निघाले दुसऱ्याच देशाचे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2023 04:06 PM2023-11-22T16:06:37+5:302023-11-22T16:07:53+5:30

काल मंगळवारी हौथी बंडखोरांनी गुजराकडे निघालेल्या एका मालवाहू जहाजाला इस्त्रायलचे जहाज समजून अपहरण केले.

Houthi rebels failed Israeli ship hijacked at sea The ship left for another country | हौथी बंडखोर फसले! समुद्रात इस्त्रायचे जहाज समजून केले अपहरण; जहाज निघाले दुसऱ्याच देशाचे

हौथी बंडखोर फसले! समुद्रात इस्त्रायचे जहाज समजून केले अपहरण; जहाज निघाले दुसऱ्याच देशाचे

काल मंगळवारी हौथी बंडखोरांनी गुजराकडे निघालेल्या एका मालवाहू जहाजाला इस्त्रायलचे जहाज समजून अपहरण केले. या जहाजात असणाऱ्या २५ जणांना ओलीस ठेवले, याबाबतचा एका व्हिडीओ समोर आला. यामुळे इस्त्रायल आणि हमास युद्धात आणखी तणाव वाढण्याचा अंदाज वर्तवला होता. आता याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. हौथी बंडखोरांनी ज्या जहाजाचे अपहरण केले ते जहाज इस्त्रायलचे नसल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे आता हौथी बंडखोरांचा प्लॅन फसल्याचे समोर आले आहे.  

गुजरातकडे येणाऱ्या जहाजाचे अपहरण; समुद्रात युद्ध भडकण्याची भीती

या जहाजाचे अपहरण होत असल्याचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हे खूपच धक्कादायक आहेत. समुद्राच्या मध्यभागी त्या जहाजावर भयंकर हल्ला झाला, बंदूकधारी हेलिकॉप्टरमधून एकामागून एक विमानात उतरले आणि बंदुकीच्या जोरावर विमानाचे अपहरण केले. या जहाज अपहरण' घटनेने लाल समुद्रात खळबळ उडाली, हे जहाज तुर्कीतून भारतात येत होते.

हल्ल्याचे असे व्हिडिओ सहसा व्हिडिओ गेम किंवा चित्रपटांमध्ये दिसतात. पण समुद्राच्या मध्यभागी एका मोठ्या जहाजाचे अपहरण झाल्याचे व्हिडिओ  पाहणे हा एक नवीन आणि भीतीदायक अनुभव आहे. हे व्हिडिओ तांबड्या समुद्राची आहेत. तिथे एक मालवाहू जहाज समुद्रातून पुढे जात होते. गॅलेक्सी लीडर असे त्या जहाजाचे नाव आहे. हवामान आल्हाददायक होते आणि जहाजाच्या डेकवर कोणीही उपस्थित नव्हते. ना कोणी क्रू मेंबर ना कोणी सुरक्षा रक्षक.

दरम्यान, कॅमेऱ्याच्या फ्रेममध्ये आकाशात उडणारे हेलिकॉप्टर दिसत आहे. काही वेळातच हेलिकॉप्टर थेट जहाजाच्या वर दिसू लागते. त्या हेलिकॉप्टरच्या तळाशी दोन ध्वज आहेत. एक येमेनचा आणि दुसरा पॅलेस्टाईनचा. या हेलिकॉप्टरमधून मुखवटाधारी सशस्त्र लढवय्ये हेलिकॉप्टरच्या आतून एक एक करून खाली येतात. यातून सहा शस्त्रधारी खाली उतरतात. ते जहाजाचा ताबा घेतात. यानंतर जहाजाच्या बाजूला छोट्या जहाजांची संख्या वाढते, यातही शस्त्रधारी सैनिक असल्याचे दिसत आहेत. यानंतर, केबिनचा दरवाजा उघडला जातो आणि जहाजात उपस्थित असलेल्या सर्व क्रू मेंबर्सना  आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले जातात आणि काही मिनिटातच जहाजाचा ताबा घेतात.

जहाज इस्त्रायलचे नाही

हे जहाज एका ब्रिटिश कंपनीच्या मालकीचे आहे, तर ते जपानी कंपनी चालवत असल्याचे इस्रायलने स्पष्ट केले आहे. जहाज अपहरणाच्या या घटनेसाठी इस्रायलने इराणला जबाबदार धरले असून ही संपूर्ण जगासाठी गंभीर घटना असल्याचे म्हटले आहे. इस्रायलने हौथी बंडखोरांच्या या कारवाईला दहशतवादाचे कृत्य म्हटले आहे आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय सागरी सुरक्षेवर निश्चितच परिणाम होईल असे म्हटले आहे. म्हणजेच या दहशतवादी कारवाईचा परिणाम समुद्रातील जहाजांच्या ऑपरेशनवर दिसून येतो.

जहाज तुर्कस्तानहून भारतात येत होते

मिळालेल्या माहितीनुसार, हे जहाज तुर्कीहून भारतात येत होते. आणि त्यात ऑटोमोबाईल्सशी संबंधित वस्तू होत्या. या जहाजाच्या अपहरणाचा व्हिडिओ जारी केल्यानंतर, हौथी प्रवक्ता याह्या सारी यांनी सांगितले की, त्यांच्या सैनिकांनी लाल समुद्रात लष्करी कारवाई सुरू केली आणि इस्रायली जहाज ताब्यात घेतले. हे जहाज येमेनच्या किनाऱ्यावर नेण्यात आले असून या जहाजातील क्रू मेंबर्सना सध्या इस्लामिक नियम आणि मूल्यांनुसार वागणूक दिली जात आहे. हौथीने गॅलेक्सी लीडर नावाच्या या जहाजाचे नुकतेच अपहरण केले. 

Web Title: Houthi rebels failed Israeli ship hijacked at sea The ship left for another country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.