भारतात सुट्टीसाठी येत असताना F1 किंवा H1B व्हिसा रिन्यू करण्याची प्रक्रिया काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2021 12:42 PM2021-11-27T12:42:34+5:302021-11-27T12:42:55+5:30
जगात असलेल्या महामारीच्या परिस्थितीमुळे दिल्लीतील अमेरिकेच्या दूतावासातील आणि वकिलातीमधील, मुंबईतील वकिलातीसह, नॉनइमिग्रंट व्हिसा आणि व्हिसा अर्ज केंद्रातील (व्हीएसी) अपॉईंटमेंटची संख्या अतिशय मर्यादित ठेवण्यात आली आहे.
प्रश्न: मी सध्या अमेरिकेत आहे. मी भारतात सुट्टीसाठी परत जाण्याची योजना आखत आहे. या दरम्यान मी माझा एफ१ किंवा एच१बी व्हिसा कसा रिन्यू करू शकतो? मला अपॉईंटमेंट स्लॉट कसा मिळेल?
उत्तर: जगात असलेल्या महामारीच्या परिस्थितीमुळे दिल्लीतील अमेरिकेच्या दूतावासातील आणि वकिलातीमधील, मुंबईतील वकिलातीसह, नॉनइमिग्रंट व्हिसा आणि व्हिसा अर्ज केंद्रातील (व्हीएसी) अपॉईंटमेंटची संख्या अतिशय मर्यादित ठेवण्यात आली आहे.
या दिवसांत, अमेरिकेत असलेल्या वैध व्हिसा धारकांनी भारताला प्रवास करण्याच्या निर्णयाचा विचार करावा असं आम्ही सुचवतो. वैध व्हिसासह अमेरिकेत काम करत असलेल्या, शिकत असलेल्या व्यक्तींनी भारतात जाऊन त्वरित त्यांच्या व्हिसाचं नुतनीकरण करण्याचा विचार टाळावा असं आम्ही सुचवतो. https://www.ustraveldocs.com/in/en वर आधीच अपॉईंटमेंट घेतली असल्यास गोष्ट वेगळी आहे. सध्या अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या अर्जदारांना त्यांचा कायदेशीर मुक्काम वाढवायचा असल्यास, त्यांनी https://www.uscis.gov/ संकेतस्थळावर जाऊन यूएस सिटिझनशिप आणि इमिग्रेशन सर्व्हिसला भेट द्यावी. सध्याच्या परिस्थितीतही भारतात जाऊ इच्छिणाऱ्यांच्या व्हिसावर प्रक्रिया करण्यासाठी वेळ लागू शकतो याची त्यांनी नोंद घ्यावी. एका ठराविक वेळेत व्हिसा मिळेल याची खात्री आम्ही देऊ शकत नाही. त्यामुळे अधिक वेळेसाठी मुक्काम करण्याची तयारी ठेवा.
स्टुडंट किंवा वर्क व्हिसावर अमेरिकेत येणाऱ्यांना सामान्यपणे 'ड्युरेशन ऑफ स्टेटस'साठी प्रवेश दिला जातो. वैध आय-७९७ (वर्कर्स) किंवा आय-२० (स्टुडंट्स) असेपर्यंत त्यांचा मुक्काम वैध असतो. असे अर्जदार कायद्यानुसार अमेरिकेत राहू शकतात. डिपार्ट होईपर्यंत ते अमेरिकेत वास्तव्य करू शकतात. ते डिपार्ट झाल्यास नवा व्हिसा त्यांना अमेरिकेत पुन्हा प्रवेश करण्यासाठी गरजेचा असतो.
वैद्यकीय किंवा मानवतावादी आपत्कालीन परिस्थिती असल्यास अर्जदार https://www.ustraveldocs.com/in/expedited-appointment.html च्या माध्यमातून एक्सपेडिटेड अपॉईंटमेंटसाठी अर्ज करू शकतो. त्यासाठी तुम्हाला आधी रेग्युलर अपॉईंटमेंट घ्यावी लागते. या अपॉईंटमेंटनंतर एक्सपेडाईट किंवा एमर्जन्सी अपॉईंटमेंटच्या विनंतीची प्रक्रिया सुरू होते. एक्सपेडाईट अर्ज केला याचा अर्थ अपॉईंमेंट मिळेलच असा होत नाही, ही बाब ध्यानात घ्या. वैद्यकीय किंवा मानवतावादी आपत्कालीन अपॉईंमेंट विनंत्यांसाठी आमचे निकष कठोर आहेत, बहुतांश विनंत्या नाकारल्या जातात, हे लक्षात ठेवा.
अतिरिक्त प्रश्न असल्यास आमच्या कस्टमर सर्व्हिस डेस्कशी https://ustraveldocs.com/in/contact-us.html वर किंवा india@ustraveldocs.com वर संपर्क साधा.
महत्त्वाची सूचना: व्हिसा आणि दूतावासाशी संबंधित पडलेल्या तुमच्या प्रश्नांना उत्तर मिळण्याचं योग्य ठिकाण म्हणजे http://www.ustraveldocs.com/in या कॉलममधून आम्ही विशिष्ट व्हिसा प्रकरणांशी संबंधित प्रश्नांची उत्तरं देत नाही. व्हिसासंबंधित सामान्य प्रश्नांची उत्तरं आम्ही देतो. तुम्हाला विशिष्ट व्हिसाबद्दल प्रश्न विचारायचे असल्यास, support-india@ustraveldocs.com वर संपर्क साधा. अमेरिकन व्हिसाचे सर्व अर्जदार अर्जाचा आयडी आणि क्रमांकासह त्यांनी अर्ज केलेल्या व्हिसाचं स्टेटस http://ceac.state.gov/ceacवर जाऊन तपासू शकता. फेसबुकवर आमचं www.facebook.com/Mumbai.USConsulate पेज लाईक करा. तर ट्विटरसाठी http://twitter.com/USAndMumbai क्लिक करून आम्हाला फॉलो करा.