अंतराळातून राम सेतू कसा दिसतो? युरोपीय स्पेस एजेन्सीने फोटो शेअर केला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 01:15 PM2024-06-25T13:15:26+5:302024-06-25T13:17:39+5:30
युरोपियन स्पेस एजन्सीने हा फोटो कोपर्निकस सेंटिनेल-2 उपग्रहावरून घेतला आहे, त्यांनी हा फोटो आपल्या एक्स खात्यावरुन शेअर केला आहे.
युरोपियन स्पेस एजन्सीने राम सेतूचा सॅटेलाईट फोटो शेअर केला आहे.हा फाटो कोपर्निकस सेंटिनेल-2 उपग्रहावरून घेतला आहे, एजन्सीने त्यांच्या एक्स खात्यावर शेअर केला आहे. तमिळनाडूतील रामेश्वरम ते श्रीलंकेतील मन्नार बेटापर्यंत विस्तारलेला राम सेतू ही चुनखडीची रचना आहे, याला ॲडम्स ब्रिज म्हणूनही ओळखले जाते, असे फोटोमध्ये दिसत आहे. पौराणिक ग्रंथांनुसार, राम सेतू भगवान रामाने आपल्या सैन्याच्या मदतीने बांधला होता. युरोपियन स्पेस एजन्सीने म्हटले आहे की, राम सेतू १५ व्या शतकापर्यंत पास करण्यायोग्य होता, पण नंतर सागरी वादळांमुळे तो अनेक ठिकाणी तुटला.
ओम बिर्ला दुसऱ्यांदा लोकसभा अध्यक्ष बनण्याची शक्यता; NDA अन् INDIA आघाडीत एकमत?
राम सेतू भारतातील रामेश्वरम आणि श्रीलंकेच्या उत्तर-पश्चिम किनाऱ्यावरील मन्नार बेटाच्या दरम्यान ४८ किलोमीटर लांब आहे. पौराणिक मान्यतेनुसार, रावणाशी लढण्यासाठी भगवान राम आणि त्यांच्या सैन्याने समुद्र ओलांडून लंकेत पोहोचले. सेतुसमुद्रम शिपिंग कालवा प्रकल्पामुळे या पुलाचा काही भाग पाडण्याचीही योजना होती. अहवालात असे म्हटले आहे की येथील काही वाळूचे ढिगारे कोरडे आहेत, तर येथील समुद्र फक्त १-१० मीटर खोल आहे, सुमारे १३० चौरस किलोमीटरमध्ये पसरलेले मन्नार बेट श्रीलंकेच्या मुख्य भूमीशी रस्ते पूल तसेच रेल्वे पुलाने जोडलेले आहे. हे दोन्ही बेटाच्या दक्षिणेकडील टोकाला दिसतात.
युरोपियन स्पेस एजन्सीने असेही म्हटले आहे की, या वाळूच्या ढिगाऱ्यांवर अनेक प्रकारचे पक्षी राहतात, याशिवाय अनेक प्रकारचे मासे आणि सागरी गवतही पाण्यात आढळतात. ॲडम्स ब्रिजच्या आसपासच्या सागरी जीवनात डॉल्फिन, डगोंग आणि कासवांचा समावेश आहे. या वर्षी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम सेतूच्या प्रारंभ बिंदू अरिचल मुनईला भेट दिली.
📸 Check out our #WeekInImages 17-21 June 2024 👉 https://t.co/0Y6huKpW9Spic.twitter.com/0KaaOMu5vB
— European Space Agency (@esa) June 23, 2024