"भूकंप होणार आहे...", वैज्ञानिकानं केलेली भविष्यवाणी खरी ठरली, अवघ्या २४ तासांपूर्वी दिलेला इशारा!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 07:15 PM2023-03-22T19:15:59+5:302023-03-22T19:17:23+5:30

अफगाणिस्तानमध्ये केंद्र असलेल्या ६.६ रिश्टर स्केलच्या भूकंपाच्या धक्क्यांनी काल रात्री संपूर्ण उत्तर भारत हादरला होता.

how frank hoogerbeets earthquake predictions come true | "भूकंप होणार आहे...", वैज्ञानिकानं केलेली भविष्यवाणी खरी ठरली, अवघ्या २४ तासांपूर्वी दिलेला इशारा!

"भूकंप होणार आहे...", वैज्ञानिकानं केलेली भविष्यवाणी खरी ठरली, अवघ्या २४ तासांपूर्वी दिलेला इशारा!

googlenewsNext

नवी दिल्ली-

अफगाणिस्तानमध्ये केंद्र असलेल्या ६.६ रिश्टर स्केलच्या भूकंपाच्या धक्क्यांनी काल रात्री संपूर्ण उत्तर भारत हादरला होता. भूकंपाचं केंद्र हिंदूकुश पर्वतरांगांच्या जमीनीखाली जवळपास १८७.६ किमी खोलवर होतं. या भूकंपाच्या धक्क्यांमुळे कझाकिस्तान, पाकिस्तान, तजाकिस्तान, चीन, भारत, उझबेकिस्तान आणि किर्गिस्तानला फटका बसला. पण या भूकंपाबाबत एक लक्षवेधी बाब आता समोर आली आहे ती म्हणजे भूकंप येणार आहे याची भविष्यवाणी एका वैज्ञानिकानं २४ तासाअधीच केली होती. नेदरलँडच्या संशोधक फ्रँक हूगरबीट्सनं या भूकंपाची भविष्यवाणी केली होती. 

हूगरबीट्सनं याआधी तुर्कीतील भूकंपाचीही भविष्यवाणी केली होती. त्यानंतर काही दिवसांतच तुर्कीत भूकंपाच्या हाहाकारानं हजारो मृत्यूमुखी पडले. फ्रँक हुगरबीट्सनं यानं कालच्या भूकंपाचा इशारा देणारा व्हिडिओ देखील आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केला होता. 

फ्रँक हूगरबीट्सनं आपल्या व्हिडिओत २२ तारखेपर्यंत भूकंपाची शक्यता वर्तवली होती. त्यानं पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागांमध्ये हे धक्के जाणवू शकतात याचा अंदाज व्यक्त केला होता. चंद्राची बदलती स्थिती आणि इतर ग्रहांसोबत होणाऱ्या ताळमेळाच्या आधारावर फ्रँक हूगरबीट्स हे भूकंपाचा अंदाज व्यक्त करतात. याशिवाय ग्रहांच्या बदलत्या स्थितीमुळे पृथ्वी भोवतीच्या वायुमंडळात होणारे परिणाम याचाही अभ्यास ते करतात. त्यानुसार ते नैसर्गिक आपत्तीची भविष्यवाणी करतात. 

फ्रँक अशी करतात भूकंपाची भविष्यवाणी
आता लोक फ्रँक हूगरबीट्स यांनी केलेली भविष्यवाणी प्रत्येकवेळी खरी कशी ठरते असा सवाल उपस्थित करत आहेत. एका व्हिडिओमध्ये फ्रँक यांनी १६ मार्च रोजी करमेडेक द्वीपजवळ आलेल्या ७.१ रिश्टर स्केलच्या भूकंपाबाबत बोलताना दिसतात. याशिवाय १८ मार्छ रोजी इक्वाडोरमध्ये आलेल्या ६.८ रिश्टर स्केलच्या भूकंपाचीही माहिती त्यांनी दिली होती. फ्रँक सांगतात की ते भूकंपाचा अंदाज ग्रहांची जियोमेट्री आणि लूनर पीक्सच्या आधारावर SSGI ग्राफ तयार करतात आणि अंदाज व्यक्त करतात. 

Web Title: how frank hoogerbeets earthquake predictions come true

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Earthquakeभूकंप