इस्रायलच्या मोसादने इराणच्या अणुकार्यक्रमाची 'सिक्रेट्स' कशी पळवली?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2018 01:42 PM2018-07-16T13:42:43+5:302018-07-16T13:54:34+5:30
दुसऱ्या महायुद्धानंतर दक्षिण अमेरिकेतील विविध देशांमध्ये पळून गेलेल्या आइखमान, क्लाऊस बार्बी, जोसेफ मेंगेला, हर्बर्ट कुकुर्स यांसारख्या नाझी अधिकाऱ्यांना शोधून काढले. कित्येक नाझी अधिकाऱ्यांना मारुनही टाकले. तशी आणखी एक साहसी मोहीम मोसादने पार पाडली, तिची माहिती उघड झाली आहे.
जेरुसलेम - इस्रायल स्वतंत्र झाल्यापासून या देशाची गुप्तवार्ता संघटना मोसादने जगभरात अनेक कारवाया केल्या आहेत. इराकच्या अणुभट्ट्या उडवणे, युगांडाच्या इदी अमिनच्या ताब्यातून आपल्या नागरिकांना सोडवून आणणे, म्युनिक ऑलिम्पिक्समध्ये मारल्या गेलेल्या इस्रायली नागरिकांच्या हत्येचा सूड घेणे अशा अनेकवेळेस मोसादने आपली कामगिरी पार पाडली आहे. इतकेच नव्हे तर दुसऱ्या महायुद्धानंतर दक्षिण अमेरिकेतील विविध देशांमध्ये पळून गेलेल्या आइखमान, क्लाऊस बार्बी, जोसेफ मेंगेला, हर्बर्ट कुकुर्स यांसारख्या नाझी अधिकाऱ्यांना शोधून काढले. कित्येक नाझी अधिकाऱ्यांना मारुनही टाकले. तशी आणखी एक साहसी मोहीम मोसादने इराणमध्ये पार पाडली.
(वेअरहाऊसमधील या कपाटांमध्ये फाईल्स व गुप्त माहिती असलेल्या सीडी होत्या)
यॉर्क टाइम्सने मोसादच्या या इराणमधील मोहिमेबद्दल माहिती प्रसिद्ध केली आहे. 31 जानेवारी रोजी मोसादचे लोक इराणची राजधानी तेहरानमधील औद्योगिक वसाहतीमध्ये एका वेअरहाऊसमध्ये घुसले. या वेअरहाऊसमध्ये मोसादच्या लोकांनी सुमारे 6 तास 29 मिनिटे शोध मोहीम राबवली आणि सकाळी 7 वाजता कामगारांची शिफ्ट सुरु होण्यापुर्वी आपलं काम थांबवून ते बाहेरही पडले. या कालावधीत मोसादच्या एजंटसनी तेथील अलार्म्स निकामी केले होते तसेच दोन दारंही फोडून आत प्रवेश केला आणि सुमारे डझनभर कपाटं फोडून कागदपत्रे घेऊन ते पळालेही. कपाटं तोडण्यासाठी 2000 अंश तापमानाची ऊर्जा निर्माण करणारे ब्लोटॉर्चेसही त्यांच्याकडे होते. इतर अनेक कपाटं सोडून नेमकी याच कपाटातील कागदपत्रे मोसादने पळवली आहेत यामुळे त्यांना नक्की कोणी मदत केली असावी यावर तर्क केले जात आहेत.
Key Mossad docs confirm extent of Iranian nuke plan revealed by Netanyahu https://t.co/nGVEnx6B9Q
— John Sekulow (@johnsekulow) July 16, 2018
Fascinaing details of how the Mossad obtained the documents and were able to get out of Iran with them. #Israel#Mossad
बाहेर पडताना या एजंटसकडे अर्धा टन वजनाचे गुप्त साहित्य होते. त्यामध्ये 50 हजार कागदपत्रे तसेच व्हिडिओ, कागदपत्रे, प्लॅन्स असणाऱ्या 163 सीडीज ही होत्या. 2015 साली इराणने अमेरिका, चीन, रशिया, युरोपियन देशांबरोबर प्रसिद्ध अणूकरार केला. त्यानंतर या वेअरहाऊसमध्ये अणूकार्यक्रमासंबंधी कागदपत्रे साठवण्यास इराणने सुरुवात केली. त्यामुळे अमेरिकन न्यूक्लिअर वॉचडॉग्सना इराणमधील अणूप्रकल्पांजवळ जाण्याची संधी मिळाली. इराणला पाकिस्तान आणि इतर अनेक देशांनी अणूकार्यक्रमात मदत केल्याचा आरोप इस्रायलने केला आहे. इस्रायलने पाश्चिमात्य देशांमधील माध्यमांना दिलेल्या माहितीनंतर या मोहिमेचे वृत्त सर्वांना समजले आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी ही सर्व माहिती टीव्ही कार्यक्रमातून उघड केली होती.
The #Mossad agents moving in on a warehouse in a drab commercial district of #Tehran knew exactly how much time they had to disable the alarms, break through two doors, cut through dozens of giant safes... #nuclear#CyberSecurity#Iran#Israelhttps://t.co/wD7MTur0yF
— Charlie Kafami (@CharlieKafami) July 16, 2018