कॅन्सरही रोखता येणार?; कोरोनासाठीच्या एमआरएनए लसीचे तंत्रज्ञान ठरणार फायद्याचे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2021 06:20 AM2021-08-09T06:20:09+5:302021-08-09T06:20:38+5:30
कोरोनाविरोधातील मोठे शस्त्र समजल्या गेलेल्या एमआरएनए लसीचे तंत्रज्ञान अमेरिकेवरील या दहशतवादी हल्ल्यानंतरच विकसित करण्यात आले. हेच तंत्रज्ञान आता कर्करोगाविरोधातही वापरले जाणार आहे...
कोरोना महासाथ आणि अमेरिकेवर झालेला दहशतवादी हल्ला यांच्यात काय संबंध आहे, असे विचारले तर साहजिकच लोक हसतील. पण कोरोनाविरोधातील मोठे शस्त्र समजल्या गेलेल्या एमआरएनए लसीचे तंत्रज्ञान अमेरिकेवरील या दहशतवादी हल्ल्यानंतरच विकसित करण्यात आले.
हेच तंत्रज्ञान आता कर्करोगाविरोधातही वापरले जाणार आहे...
कर्करोगावर कशी मात करेल?
शरीरात त्वचेच्या खाली जो स्तर असतो त्यावर विशिष्ट प्रकारच्या प्रोटिन स्पाइक्सने तयार झालेल्या आकृत्या म्हणजेच कोरोना विषाणू.
अशाच प्रकारे कर्करोगाच्या बाबतीतही एमआरएनए लसीमुळे शरीरातील प्रतिकारशक्ती कर्करोगाच्या पेशींना ओळखून त्यांच्यावर मात करेल.
मेसेंजर आरएनए लस या विषाणूला प्रतिरोध करण्यासाठी त्याच्यासारख्याच आकृत्या तयार करण्याचे आदेश शरीरातील पेशींना देते.
हे प्रोटिन तयार झाले की पेशी त्यांचे विभाजन करून प्रतिकारशक्तींना अँटिबॉडी तयार करण्यास प्रोत्साहित करते. त्यातून कोरोनाची बाधा
होण्याचे संकट टळते.
वेगळेपण काय?
यातूनच कर्करोग अवरोधी लस तयार करण्याची संकल्पना पुढे आली.
एमआरएनए ही लस न्युक्लिक ॲसिड लस या श्रेणीतील आहे.
ज्या विषाणूचा संसर्ग झाला आहे त्या विषाणूच्या पॅथोजनच्या जनुक साहित्याचा वापर लसीसाठी केला जातो.
त्यामुळे शरीरात विषाणूविरोधातील प्रतिकारशक्ती कार्यान्वित होते.
एमआरएनए लसीचा इतिहास
अँथ्रॅक्स या विषाणूच्या साह्याने हल्ला करण्याचे प्रमाण अमेरिकेत वाढले होते. या पार्श्वभूमीवर अमेरिकी संरक्षण मंत्रालयाने मॉडर्ना कंपनीला आरएनएआधारित लस तयार करण्याचे कंत्राट दिले.
त्याच तंत्रावर आधारित तयार झालेली एमआरएनए लस कोरोनानंतर कर्करोगावरही मात करण्यास सज्ज झाली आहे.
यावर प्रभावी ठरण्याची शक्यता
घशाचा कर्करोग
गर्भाशयाचा कर्करोग
स्तनाचा कर्करोग
यकृताचा कर्करोग
प्रोस्टेट ग्रंथींचा कर्करोग
विविध प्रकारचे ट्युमर्स
१कोटी
डब्ल्यूएचओच्या अहवालानुसार २०२० मध्ये कर्करोगामुळे जगभरात सुमारे १ कोटी लोकांना प्राण गमवावे लागले.