एका वर्षात वायग्रावर किती खर्च करते अमेरिकन सेना? वाचून व्हाल अवाक्...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2023 11:40 AM2023-07-15T11:40:13+5:302023-07-15T11:40:54+5:30
US Army Viagra : हैराण करणारा हा खुलासा डेमोक्रेटिक पार्टीच्या महिला खासदार समर ली यांनी केला. ली म्हणाल्या की, इतक्या पैशांमध्ये सामान्य लोकांचं जीवन बदललं जाऊ शकतं. त्या असंही म्हणाल्या की, 'इतक्या पैशांमध्ये पिट्सबर्गमधील पुलांची कामे केली जाऊ शकतात.
Viagra use by US Army: अमेरिकेच्या संसेदत असा दावा करण्यात आला आहे की, अमेरिकेची सेना एका वर्षात वायग्रावर सरासरी 41.6 मिलियन डॉलर इतकी मोठी रक्कम खर्च करते. हैराण करणारा हा खुलासा डेमोक्रेटिक पार्टीच्या महिला खासदार समर ली यांनी केला. ली म्हणाल्या की, इतक्या पैशांमध्ये सामान्य लोकांचं जीवन बदललं जाऊ शकतं. त्या असंही म्हणाल्या की, 'इतक्या पैशांमध्ये पिट्सबर्गमधील पुलांची कामे केली जाऊ शकतात आणि इतरही बरीच कामे होऊ शकतात. सेनेत वायग्राचा वापर आणि त्यासाठी होणारा खर्च हे सांगणारा त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
अमेरिकन संसद आणखी एका सुरक्षा पॅकेजवर मतदान करणार आहे. ज्यात वेगवेगळ्या सदस्यांच्या वेगवेगळ्या प्राथमिकता आहेत. वोटिंगआधी होणाऱ्या चर्चेत डेमोक्रेटिक पार्टीच्या खासदार समर ली यांनी सेनेच्या मोठ्या खर्चावर प्रश्न उपस्थित केले.
पेंसिल्वेनियाच्या 12th डिस्ट्रिक्टचं प्रतिनिधित्व करणाऱ्या समर ली यांनी सुरक्षा विभागाच्या एका अधिकाऱ्याला सैन्याच्या खर्चासंबंधी प्रश्न विचारले. ज्याची माहिती त्यांना नव्हती. यानंतर स्वत:च आपल्या प्रश्नाचं उत्तर ली यांनी देत आकडेवारी सांगितलं. सोबतच म्हणाल्या इतक्या पैशात अमेरिकेच्या अनेक समस्या सोडवल्या जाऊ शकतात.
अमेरिकन खासदार समर ली यांनी विचारलं की, 'एका वर्षात मिलिट्री वा वायग्रावर सरासरी किती खर्च करते? यावर अधिकारी म्हणाले की, 'सॉरी, याबाबत माझ्याकडे कोणतीही आकडेवारी नाही'. मग समर ली म्हणाल्या की, 'साधारण 41.6 मिलियन डॉलर. तुम्हाला माहीत आहे का की, यातून माझ्या जिल्ह्यात काय काय केलं जाऊ शकतं. ली यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.