इमिग्रेशन एँड नॅशनॅलिटी कायद्याच्या अंतर्गत रद्द झालेल्या व्हिसा अर्जासाठी प्रक्रिया कशी सुरू करावी?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2022 02:53 PM2022-01-29T14:53:28+5:302022-01-29T14:58:04+5:30
तुमच्या अर्जावर पुढील प्रक्रिया करण्यासाठी तुम्हाला अमेरिकेच्या दुतावासाशी संपर्क साधण्याची गरज नाही. आम्ही अशा प्रकरणांमध्ये लक्ष घालून तुमच्या अर्जावर नमूद केलेल्या ईमेलवर संपर्क साधू.
प्रश्न- मी मुंबईतील दुतावासात व्हिसासाठी अर्ज केला होता. पण तिथल्या अधिकाऱ्यानं इमिग्रेशन एँड नॅशनॅलिटी कायद्याच्या कलम २२१ (जी) अंतर्गत पी. पी. १०१९९ रद्द झाल्याचं पत्र माझ्या हाती दिलं. आता ते प्रोक्लेमेशन हटवण्यात आलं आहे. त्यामुळे मी माझ्या अर्जाची प्रक्रिया सुरू करावी का?
उत्तर- २५ ऑक्टोबरला अध्यक्ष बायडेन यांनी नवीन प्रेसिडेन्शियल प्रोक्लेमेशन जारी केलं. त्याचं शीर्षक 'प्रोक्लेमेशन ऑन ऍडव्हान्सिंग द सेफ रिज्मशन ऑफ ग्लोबल ट्रॅव्हल ड्युरिंग द कोविड-१९ पॅन्डेमिक' असं आहे. नव्या प्रेसिडेन्शियल प्रोक्लेमेशनमुळे अमेरिकेच्या दुतावासांना व्हिसा अर्जावर प्रक्रिया करण्याची परवानगी मिळाली आहे. इमिग्रेशन एँड नॅशनॅलिटी कायद्याच्या कलम २२१ (जी) अंतर्गत रद्द करण्यात आलेल्या अर्जांवर प्रक्रिया करण्याची मंजुरी आता दुतावासांना मिळाली आहे.
तुमच्या अर्जावर पुढील प्रक्रिया करण्यासाठी तुम्हाला अमेरिकेच्या दुतावासाशी संपर्क साधण्याची गरज नाही. आम्ही अशा प्रकरणांमध्ये लक्ष घालून तुमच्या अर्जावर नमूद केलेल्या ईमेलवर संपर्क साधू. तुमच्या मुलाखत अर्जावर देण्यात आलेला ईमेल ऍड्रेस हाच तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग आहे ही बाब लक्षात ठेवा. त्यामुळे अर्जदारांनी त्यांचे ईमेल काळजीपूर्वक तपासावेत. तुम्ही चुकीचा ई-मेल ऍड्रेस भरला आहे किंवा चुकून तो डिलीट केला आहे, असं तुम्हाला वाटत असेल, तर india@ustraveldocs.com वर संपर्क साधा.
मेल आल्यावर त्यात देण्यात आलेल्या सुचनांनुसार कृती करा. ईमेलमधून अतिरिक्त माहिती मागितली जाऊ शकते. मुंबईतील दुतावासात तुम्हाला मुलाखतीसाठी पुन्हा हजर राहण्यास सांगितलं जाऊ शकतं किंवा दुतावासात तुम्हाला पासपोर्ट जमा करण्यास सांगितलं जाऊ शकतं. तुमच्या बाबतीत असलेली सूचना ईमेलमध्ये स्पष्टपणे नमूद केलेली असेल. कृपया त्या सुचनांचं पालन करा.
महत्त्वाची सूचना: व्हिसा आणि दूतावासाशी संबंधित पडलेल्या तुमच्या प्रश्नांना उत्तर मिळण्याचं योग्य ठिकाण म्हणजे http://www.ustraveldocs.com/in या कॉलममधून आम्ही विशिष्ट व्हिसा प्रकरणांशी संबंधित प्रश्नांची उत्तरं देत नाही. व्हिसासंबंधित सामान्य प्रश्नांची उत्तरं आम्ही देतो. तुम्हाला विशिष्ट व्हिसाबद्दल प्रश्न विचारायचे असल्यास, support-india@ustraveldocs.com वर संपर्क साधा. अमेरिकन व्हिसाचे सर्व अर्जदार अर्जाचा आयडी आणि क्रमांकासह त्यांनी अर्ज केलेल्या व्हिसाचं स्टेटस http://ceac.state.gov/ceacवर जाऊन तपासू शकता. फेसबुकवर आमचं www.facebook.com/Mumbai.USConsulate पेज लाईक करा. तर ट्विटरसाठी http://twitter.com/USAndMumbai क्लिक करून आम्हाला फॉलो करा.