शुक्र ग्रहावरील माहिती कशी मिळवणार NASA? DAVINCI मिशनचा हैराण करणारा व्हिडीओ जारी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2021 03:55 PM2021-11-18T15:55:07+5:302021-11-18T15:56:49+5:30
अमेरिकेची एजन्सी नासाने (NASA) एक सुंदर व्हिडीओ शेअर केलाय. हा व्हिडीओ शुक्र ग्रहाबाबत (planet venus जाणून घेण्याासाठी सुरू करण्यात येणाऱ्या 'दाविंची' (DAVINCI) मिशनचा आहे.
अंतराळातील रहस्यमय गोष्टींचा उलगडा करण्यासाठी वैज्ञानिक सतत मेहनत करत असतात. अंतराळाबाबत वैज्ञानिकांकडून सतत नवनवीन माहिती समोर येत असते. अशात अमेरिकेची एजन्सी नासाने (NASA) एक सुंदर व्हिडीओ शेअर केलाय. हा व्हिडीओ शुक्र ग्रहाबाबत (planet venus) जाणून घेण्याासाठी सुरू करण्यात येणाऱ्या 'दाविंची' (DAVINCI) मिशनचा आहे.
या मिशनच्या माध्यमातून नासा शुक्र ग्रहावरील वातावरण आणि पृष्ठभाग याबाबत माहीत मिळवणार आहे. या व्हिडीओतून नासाने या मिशनची माहिती दिली आहे. हे मिशन नासाकडून २०२९ मध्ये सुरू करण्यात येणार आहे. नासाकडून १९९० पासून शुक्र ग्रहावर कोणतंही मिशन करण्यात आलं नाही. त्यामुळे या मिशनबाबत अंतराळ वैज्ञानिकांमध्ये फारच उत्साहाचं वातावरण आहे.
कसं असेल मिशन?
अमेरिकन अंतराळ एजन्सी नासाच्या DAVINCI मिशनचं पूर्ण नाव आहे डीप एटमॉस्फिअर वीनस इन्व्हेस्टिगेशन ऑफ नोबल गॅस, केमिस्ट्री अॅन्ड इमेजिंग. हे मिशन नासा दोन भागात पूर्ण करण्याच्या तयारीत आहे. पहिल्या भागात यान शुक्र ग्रहाची परिक्रमा करणार. त्यानंतर एजन्सी यानाद्वारे प्रोब शुक्र ग्रहाच्या पृष्ठभागावर पाडेल. पृथ्वीपेक्षा शुक्रचं वायुमंडल साधारण ९० टक्के दाट आहे.
कार्बन डायऑक्साइड आणि सल्फ्यूरिक अॅसिडपासून शुक्र ग्रहावरील ढग निर्माण होतात. अंतराळ यानातून सोडल्यावर प्रोब हळूहळू शुक्रच्या पृष्ठभागावर जाणार आणि प्रोबमधील सेंसर वातावरणाचं रीडिंग घेतील. शुक्रच्या वातावरणात प्रोब ऑक्सीजनचा शोध घेणार, ज्याने पाण्याच्या उपलब्धतेबाबतही माहिती मिळेल.