'हाऊडी, मोदी' हाऊसफुल्ल, अमेरिकेत मोदींच्या 'शो'साठी 50 हजारांचे बुकिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2019 09:43 AM2019-08-22T09:43:13+5:302019-08-22T09:46:29+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदींना जगभरातून फॅन फोलोविंग आहे. त्यामुळेच, बेयर ग्रिल्ससोबतचा शो आत्तापर्यंतचा जगातील सर्वाधिक ट्रेंडिंग शो ठरला आहे.

Howdy, Modi 'Housefull, 50 thousand bookings for Modi's show in the United States | 'हाऊडी, मोदी' हाऊसफुल्ल, अमेरिकेत मोदींच्या 'शो'साठी 50 हजारांचे बुकिंग

'हाऊडी, मोदी' हाऊसफुल्ल, अमेरिकेत मोदींच्या 'शो'साठी 50 हजारांचे बुकिंग

googlenewsNext
ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदींना जगभरातून फॅन फोलोविंग आहे. त्यामुळेच, बेयर ग्रिल्ससोबतचा शो आत्तापर्यंतचा जगातील सर्वाधिक ट्रेंडिंग शो ठरला आहे.दक्षिण पश्चिम अमेरिकेत सर्वसाधारपणे वापर करण्यात येणार मैत्रीपूर्ण शब्द म्हणजे 'हाऊडी' होय.

वाशिंग्टन - अमेरिकेतील ह्यूस्टन येथे पुढील महिन्यात होणाऱ्या हाऊडी मोदी कार्यक्रमाला उंदड प्रतिसाद मिळाला आहे. या कार्यक्रमासाठी 50 हजार आसनाच्या बैठकीची व्यवस्था केली होती. मात्र, महिनाभरापूर्वीच याचं बुकिंग फुल्ल झालं आहे. त्यामुळे हाऊडी मोदी हा कार्यक्रम हाऊसफुल झाल्याचे या कार्यक्रमाचे आयोजक एनजीओ टेक्सास इंडिया फोरम (टीआयएफ) यांनी सांगितलं आहे. यावरुन पंतप्रधान मोदींची लोकप्रियता अमेरिकेतही कायम असल्याचं ते म्हणाले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींना जगभरातून फॅन फोलोविंग आहे. त्यामुळेच, बेयर ग्रिल्ससोबतचा शो आत्तापर्यंतचा जगातील सर्वाधिक ट्रेंडिंग शो ठरला आहे. तर, यापूर्वीच्याही मोदींच्या अमेरिकीतल कार्यक्रमांना मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले आहे. अमेरिकत सप्टेंबर महिन्यात हाऊडी मोदी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी, सभागृहात 50 हजार आसन व्यवस्था ठेवण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे बुकिंग अगोदर हाऊसफुल्ल झालं आहे. विशेष म्हणजे, अजूनही बुकिंग सुरूच असून या इच्छुकांना वेटींगवर ठेवण्यात येणार असल्याचं टीआयएफने म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिकेतील हा तिसरा कार्यक्रम आहे. यापूर्वी 2014 मध्ये न्यूयॉर्क येथील मेडिसन स्क्वॉयर गार्डन तर 2016 मध्ये सिलिकॉन व्हॅली येथे भारतीय वंशांच्या नागरिकांना मोदींनी संबोधित केले होते. या कार्यक्रमांवेळी 20 हजारांपेक्षा जास्त लोकांची उपस्थिती होती. मात्र, यावेळीच्या कार्यक्रमाला 50 हजारांपेक्षा जास्त लोकांची उपस्थिती राहिल. दरम्यान, ह्यूस्टन हे अमेरिकेतील चौथ्या क्रमांचे सर्वात मोठे शहर असून येथे 1.30 लाख भारतीय वंशाचे नागरिक राहतात. 27 सप्टेंबर रोजी पंतप्रधा नरेंद्र मोदी संयुक्त राष्ट्र महासभेत सहभागी होत आहेत. त्याच भेटीदरम्यान हा कार्यक्रम पार पडणार आहे. 

हाऊडी म्हणजे काय ?
दक्षिण पश्चिम अमेरिकेत सर्वसाधारपणे वापर करण्यात येणार मैत्रीपूर्ण शब्द म्हणजे 'हाऊडी' होय. हाऊडी या शब्दाचा अर्थ हाऊ डू यु डू म्हणजे कसा आहेस तू ? असा होतो. मोदींसाठी आयोजित हाऊडी मोदी या कार्यक्रमाची टॅगलाईन ‘शेयर्ड ड्रीम्स, ब्राइट फ्यूचर्स’ अशी ठेवण्यात आली आहे. 
 

Web Title: Howdy, Modi 'Housefull, 50 thousand bookings for Modi's show in the United States

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.