Howdy Modi: मोदींनी मनं जिंकली, अमेरिकेत ‘हाउडी मोदी’चा गजर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 04:44 AM2019-09-23T04:44:50+5:302019-09-23T06:42:40+5:30

स्वच्छतेबद्दल मोदी थेट कृतीही करतात; जमिनीवर पडलेले फूल उचलले; नेटिझन्सनी केली मोठी प्रशंसा

Howdy Modi pm narendra Modi wins hearts in America | Howdy Modi: मोदींनी मनं जिंकली, अमेरिकेत ‘हाउडी मोदी’चा गजर

Howdy Modi: मोदींनी मनं जिंकली, अमेरिकेत ‘हाउडी मोदी’चा गजर

Next

ह्युस्टन : स्वच्छतेसाठी सतत आग्रह धरणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण फक्त बोलतच नसून प्रत्यक्ष कृतीही करतो हे दाखवून नेटिझन्सची मने जिंकली. मोदी यांचे शनिवारी येथे जॉर्ज बुश इंटरकॉन्टिनेंटल विमानतळावर ‘हाउडी मोदी’ कार्यक्रमासाठी आगमन झाल्यावर अमेरिकन उच्चपदस्थाने त्यांना पुष्पगुच्छ भेट दिल्यावर त्यातील एक फूल खाली पडले आणि तेथील उपस्थितांना आश्चर्याचा धक्काच बसला, कारण ते फूल मोदी यांनी स्वत: उचलले तेव्हा त्यांच्या या कृतीची समाज माध्यमांवर प्रशंसा झाली.

‘मोदी यांनी त्यांना भेट दिल्या गेलेल्या पुष्पगुच्छातील फूल किंवा त्याची जमिनीवर पडलेली दांडी उत्स्फूर्तपणे उचलून त्यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्याकडे दिली. किती हा साधेपणा’, असे एका युझरने टिष्ट्वटरवर म्हटले. मोदी यांना बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशनचा स्वच्छतेच्या क्षेत्रात ‘स्वच्छ भारत अभियान’च्या माध्यमातून नेतृत्वासाठी ‘ग्लोबल गोलकीपर्स अवॉर्ड’ प्रदान केला जाणार आहे. दोन आॅक्टोबर, २०१४ पासून स्वच्छ भारत अभियानाला प्रारंभ झाला तेव्हापासून देशात १० कोटींपेक्षा जास्त स्वच्छतागृहे बांधली गेली आहेत. स्वच्छ भारत अभियान हे इतर देशांसाठीही मार्गदर्शक ठरू शकते. कारण जगातील अत्यंत गरीब व्यक्तींना या मोहिमेतून स्वच्छतागृह तातडीने उपलब्ध करून दिले जाऊ शकते. (वृत्तसंस्था)

नवा काश्मीर उभारू; नरेंद्र मोदींचे काश्मिरी पंडितांना आश्वासन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १७ सदस्यांच्या काश्मिरी पंडितांच्या शिष्टमंडळाची येथे विशेष भेट घेऊन प्रत्येकासाठी असेल असा ‘नवा काश्मीर’ उभारण्याचे आश्वासन त्यांना दिले. या शिष्टमंडळात अमेरिकेत राहणाºया काश्मिरी पंडितांचा समावेश होता.

मोदी यांचे अमेरिकेच्या सात दिवसांच्या दौºयावर येथे आगमन झाल्यावर ही भेट झाली. ‘काश्मीरमध्ये नवे वारे वाहत असून, आम्ही सगळे एकत्र येऊन प्रत्येकासाठी असेल असा नवा काश्मीर बनवू’, असे मोदी यांनी शिष्टमंडळाला सांगितले. भारत सरकारने जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा मिळालेला घटनेतील अनुच्छेद ३७० गेल्या पाच ऑगस्ट रोजी रद्द करून जम्मू आणि काश्मीर व लडाख हे दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश निर्माण केले.

गेली ३० वर्षे संयम दाखविल्याबद्दल मोदी यांनी काश्मिरी पंडितांचे आभारही मानले. ‘माझी काश्मिरी पंडितांशी विशेष चर्चा झाली’, असे मोदी यांनी नंतर टिष्ट्वटरद्वारे सांगितले. तत्पूर्वी, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी भारत सरकारने देशाच्या प्रगतीसाठी आणि प्रत्येक भारतीय सक्षम होण्यासाठी उचललेल्या पावलांना आपला नि:संदिग्ध पाठिंबा काश्मिरी पंडितांनी व्यक्त केला, असे टिष्ट्वटरवर म्हटले. शिष्टमंडळाने आमचा सात लाख संख्येतील समाज मोदी यांच्या सरकारचा ऋणी आहे, असे सांगून मोदी यांचे आभार मानले.

गुड टाइम
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ह्युस्टनला ‘हाउडी मोदी’ कार्यक्रमासाठी जाताना टष्ट्वीट केले. ‘ह्युस्टनमध्ये माझ्या मित्राबरोबर (नरेंद्र मोदी यांच्यासमवेत) कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात आहे. टेक्सासमध्ये हा एक चांगला दिवस असेल’, असे टष्ट्वीटमध्ये म्हटले.
ट्रम्प यांच्या या टष्ट्वीटला उत्तर देताना मोदी यांनीही टष्ट्वीट केले. ‘खरोखरच हा चांगला दिवस असेल. तुमच्या भेटीची वाट पाहत आहे’.

महापौरांनी केले स्वागत
ह्युस्टनचे महापौर सिल्व्हेस्टर टर्नर यांनी कार्यक्रमात सर्वांचे स्वागत केले. अमेरिका हा भारताचा मित्र आहे, याचा अभिमान आहे, असे ते म्हणाले. यावेळी अनेक राज्यांचे प्रतिनिधी व्यासपीठावर उपस्थित होते. आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ट्रम्प भारतात येणार असल्याची माहितीही यावेळी सूत्रांनी दिली.

Web Title: Howdy Modi pm narendra Modi wins hearts in America

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.