Howdy Modi : ...अन् नरेंद्र मोदी म्हणाले 'फिर एक बार, नमो नम:'!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2019 12:17 PM2019-09-22T12:17:23+5:302019-09-22T12:26:23+5:30

मोदींना भेटल्यानंतर काश्मिरी पंडित भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

Howdy Modi : Prime Minister Narendra Modi meets and interacts with a delegation of Kashmiri Pandits in Houston | Howdy Modi : ...अन् नरेंद्र मोदी म्हणाले 'फिर एक बार, नमो नम:'!

Howdy Modi : ...अन् नरेंद्र मोदी म्हणाले 'फिर एक बार, नमो नम:'!

Next

ह्युस्टन - सध्या अमेरिका दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अनेकांच्या भेटीगाठी घेतल्या. यादरम्यान मोदींनी अमेरिकास्थित काश्मिरी पंडितांच्या प्रतिनिधी मंडळाचीही भेट घेतली. मोदींना भेटल्यानंतर काश्मिरी पंडित भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यापैकी काही जणांनी मोदींच्या हातांचे चुंबन घेत मोदींचे आभार मानले.  काश्मिरी पंडितांनी नमस्ते शारदा देवी या श्लोकाचे वाचन केल्यावर श्लोकाच्या शेवटी मोदी 'अगेन नमो नम:' असे म्हणाले. त्यानंतर तेथे उपस्थित असलेल्यांमध्ये एकच हशा पिकला. 

2019 च्या लोकसभा निवडणुकीत मिळवलेला मोठा विजय आणि जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा धोरणात्मक निर्णय घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथमच 7 दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत.  दरम्यान, ह्युस्टन येथे मोदींनी काश्मिरी प्रतिनिधी मंडळाची भेट घेतली. काश्मीरमधून कलम ३७० कलम हटवल्याच्या पार्श्वभूमीवर काश्मिरी पंडित या भेटीवेळी खूप भावूक झालेले दिसून आले. कलम ३७० बाबतच्या निर्णयामुळे समाधानी असलेल्या एका काश्मिरी पंडिताने मोदींच्या हाताचे चुंबन घेतले. तसेच ७ लाख काश्मिरी पंडितांच्यावतीने त्यांचे आभार मानले. 



दरम्यान, मोदींनी दौऱ्याच्या सुरुवातीला काश्मिरी पंडितांसोबतच,अमेरिकेतील शीख समुदाय आणि बोहरा मुस्लिमांच्या समुदायाच्या शिष्टमंडळांचीही भेट घेतली. तसेच तेल क्षेत्रातील कंपन्यांच्या सीईओंचीही मोदींनी भेट घेतली.  

आज अमेरिकेच्या टेक्सासमधील ह्युस्टन सिटीमध्ये असणार आहेत. ह्युस्टनमध्ये ऐतिहासिक ‘हाऊडी मोदी’ कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू आहे. ‘टेक्सास इंडिया फोरम’ हे  ‘हाऊडी मोदी’ कार्यक्रमाचे आयोजक आहेत. मात्र, भाजपचा परराष्ट्र व्यवहार विभाग आणि पीएमओ या व्यवस्थेची देखरेख करीत आहेत. तीन तासांचा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पीएमओ नियमितपणे व्हाईट हाऊसच्या संपर्कात आहे. असे संकेत मिळत आहेत की, ट्रम्प हे ‘हाऊडी मोदी’ कार्यक्रमात पूर्ण वेळ थांबणार नाहीत. दोन्ही देशांतील तणाव दूर करण्यासाठी ट्रम्प काही घोषणा करू शकतात. ह्युस्टनमध्ये गुजराती समुदायाचे समर्थन प्राप्त करण्यासाठी भाजपचे गुजरातमधील आमदार आणि काही खासदार यापूर्वीच ह्युस्टनमध्ये दाखल झाले आहेत. डेमोक्रॅटिकचे वरिष्ठ सदस्य स्टेनी होयरसह 60 पेक्षा अधिक अमेरिकी संसद सदस्य सहभागी होतील.
 

Web Title: Howdy Modi : Prime Minister Narendra Modi meets and interacts with a delegation of Kashmiri Pandits in Houston

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.