जपानच्या भूकंपात घरांचे प्रचंड नुकसान; तीन ठार, ३00 जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 04:08 AM2018-06-19T04:08:03+5:302018-06-19T04:08:03+5:30
जपानच्या पश्चिमेकडल ओसाका येथे सोमवारी भूकंपाचा तीव्र धक्का बसून, तीन जण ठार तर ३00 हून अधिक लोक जखमी झाले.
टोकियो : जपानच्या पश्चिमेकडल ओसाका येथे सोमवारी भूकंपाचा तीव्र धक्का बसून, तीन जण ठार तर ३00 हून अधिक लोक जखमी झाले. या भूकंपाची तीव्रता ६.१ इतकी होती. भूकंपामुळे ओसाकामध्ये प्रचंड नुकसान झाले असून, अनेक इमारती कोसळल्या आहेत. स्थानिक वेळेनुसार भूकंपाचा हा झटका सकाळी ८ वाजताच्या जाणवला. भूकंपानंतर अनेकदा धक्के बसत राहतात, हे लक्षात घेऊ न, त्या भागात अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू ओसाकाच्या उत्तरेकडील भागात होता.भूकंपामुळे एका घराची भिंत नऊ वर्षाच्या मुलीच्या अंगावर भिंत कोसळली आणि ती जागीच मरण पावली. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, घरे पडल्याने वा मोडकळीस आल्याने अनेकांना सुरक्षित जागी हलवण्यात आले आहे.