दोन पायांवर चालत असल्याने मानवी मेंदूचा विकास

By Admin | Published: May 28, 2014 02:42 AM2014-05-28T02:42:10+5:302014-05-28T02:42:10+5:30

आदिमानवाने दोन पायांवर चालण्याचे तंत्र शिकून घेतल्याने माणसाच्या मेंदूचा विकास इतर प्राण्यांच्या तुलनेत अधिक झाला व मेंदूची रचना अधिक क्लिष्ट झाली

Human brain development is being run on two feet | दोन पायांवर चालत असल्याने मानवी मेंदूचा विकास

दोन पायांवर चालत असल्याने मानवी मेंदूचा विकास

googlenewsNext

मेलबर्न : आदिमानवाने दोन पायांवर चालण्याचे तंत्र शिकून घेतल्याने माणसाच्या मेंदूचा विकास इतर प्राण्यांच्या तुलनेत अधिक झाला व मेंदूची रचना अधिक क्लिष्ट झाली, असे एका नव्या अभ्यासात म्हटले आहे. अनेक प्राणी हुशार असतात; पण माणूस सर्वांपेक्षा अधिक बुद्धिमान आहे. इतर प्राण्यापेक्षा आपले विचार करणे व कृती वेगळी का असते, यावर संशोधन करणार्‍या संशोधकांनी हा नवा विचार मांडला आहे. एक छोटा मुलगा चालायला शिकत असताना, त्याचे वडील व आजोबा दोघांनीही हे निरीक्षण केले. वडील व आजोबा दोघेही सिडने विद्यापीठात प्राध्यापक आहेत. पितापुत्र मॅक व रिक शाईन यांनी केलेल्या संशोधनानुसार मानव व इतर प्राणी यांच्यात एक मोठा फरक आहे. दैनंदिन कामकाजात आपण मेंदूचा वापर करतो. मेंदूचे बाह्य आवरण (कोर्टेक्स) पांढर्‍या रंगाचे असते. दैनंदिन कामकाजात या कोर्टेक्सकडून आपल्याला सूचना मिळतात. सूचनांचे विश्लेषण करण्याची क्षमता या कोर्टेक्समध्ये असते. त्यामुळे त्याच त्याच कामातून आपल्याला मुक्ती मिळू शकते. टायलर शाईन हा दोन वर्षांचा मुलगा आहे. अलीकडेच तो चालायला शिकला आहे. टायलर चालायला शिकला, तेव्हा त्याच्यात कोणते बदल झाले यावर शाईन पिता-पुत्रांचे बारीक लक्ष होते. टायलर आपल्या प्रत्येक पावलाकडे लक्ष ठेवून चालत असे. चालायला आल्यानंतर तो आजूबाजूच्या गोष्टींकडे लक्ष देऊ लागला. चालण्यात पुरते संतुलन आल्यानंतर, त्याच्या खोड्या सुरू झाल्या. आपल्या पायांचे संतुलन गाठल्यानंतर हे काम मेंदूच्या खालच्या भागाकडे गेले. त्यामुळे कोर्टेक्स अन्य बाबींकडे लक्ष देण्यास मोकळा झाला. जमिनीवर पडलेली खेळणी गोळा करणे हे काम त्याला सहज जमू लागले. मग जमिनीची फरशी खालवर असली तरीही त्याचे संतुलन कधीही डगमगले नाही. कार चालवणे किंवा एखादे वाद्य वाजवणे यासाठी मेंदूची एकाग्रता आवश्यक असते; पण कालांतराने त्याचीही सवय होते, असे मॅक शाईन यांचे म्हणणे आहे. एखादे काम असे सवयीचे झाले की त्याचे नियंत्रण खालच्या मेंदूकडे जाते, सेरेबेलम या नावाने हा भाग ओळखला जातो. जे काम आपण नेहमी करतो, त्याचे नियंत्रण असे सेरेबेलमकडे जाते व इतर बाबींकडे कोर्टेक्स लक्ष देतो. त्यामुळे माणूस अनेक आव्हाने स्वीकारू शकतो, असे मॅक यांनी म्हटले आहे. हे संशोधन न्यूरोसायन्सवरील जर्नल फ्रंटियर्समध्ये प्रसिद्ध झाले आहे.

Web Title: Human brain development is being run on two feet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.