पाण्यात सापडला मानवी मेंदू खाणारा जीवाणू, खबरदारीच्या सूचना जारी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2020 08:44 AM2020-09-27T08:44:33+5:302020-09-27T08:52:22+5:30

पाण्यामध्ये हा जीवाणू सापडण्याचे प्रकार ८ सप्टेंबरपासून सुरू झाले होते. पाण्यामध्ये अमिबा असल्याची बाब एका सहा वर्षांच्या मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर समोर आली होती

Human brain-eating amoeba found in water in US, issued warning instructions | पाण्यात सापडला मानवी मेंदू खाणारा जीवाणू, खबरदारीच्या सूचना जारी

पाण्यात सापडला मानवी मेंदू खाणारा जीवाणू, खबरदारीच्या सूचना जारी

googlenewsNext
ठळक मुद्देपाणी पुरवठ्यामधून येणाऱ्या पाण्यामध्ये नाइगेलेरिया फाऊलेरी म्हणजेच मेंदू कुडतरणारा अमिबा सापडला आहेपाणीपुरवठ्यामध्ये हा अमिबा सापडल्यानंतर आठ शहरांमधील नागरिकांना टेक्सासमधील प्रशासनाने जारी केली खबरदारीची सूचनाखबरदारी घेऊन, सांभाळून राहा अन्यथा हा जीवाणू विध्वंस घडवून आणू शकतो, असे प्रशासनाने म्हटले आहे

टेक्सास (अमेरिका) - अमेरिकेच्या टेक्सास प्रांताच्या दक्षिण पूर्व भागात पाणी पुरवठ्यामध्ये एक धोकादायक जीवाणू सापडला आहे. हा जीवाणू मानवी मेंदू खात असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्यामध्ये हा अमिबा सापडल्यानंतर आठ शहरांमधील नागरिकांना टेक्सासमधील प्रशासनाने खबरदारीची सूचना जारी केली आहे. खबरदारी घेऊन, सांभाळून राहा अन्यथा हा जीवाणू विध्वंस घडवून आणू शकतो, असे प्रशासनाने म्हटले आहे.

टेक्सास कमिशनने पर्यावरण गुणवत्तेच्या आधारावर वॉटर अ‍ॅडव्हायजरी जारी केली आहे. पाणी पुरवठ्यामधून येणाऱ्या पाण्यामध्ये नाइगेलेरिया फाऊलेरी म्हणजेच मेंदू कुडतरणारा अमिबा सापडला आहे. त्यामुळे या पाण्याचा वापर तत्काळ बंद करा, अशी सूचना केली आहे.

टेक्सास कमिशन पर्यावरण गुणवत्तेचा विचार करून ब्राजोस्पोर्ट वॉटर अ‍ॅथॉरिटीसोबत मिळून लवकरात लवकर पाण्याची सध्याची समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहे. सेंटर फॉर डिजीस कंट्रोल अँड प्रिव्हेंशनच्या माहितीनुसार मेंदू कुडतरणारा हा अमिबा सर्वसाधारणपणे माती, गरम पाण्याचे कुंड, नदी आणि गरम पाण्याच्या झऱ्यांमध्ये सापडतात. हा अमिबा स्वच्छतेचा अभाव असलेल्या स्वीमिंग पूलमध्येसुद्धा मिळू शकतो. हा अमिबा औद्योगिक प्लँटमधून निघणाऱ्या गरम पाण्यामध्येसुद्धा आढळून येतो.



दरम्यान, अशाप्रकारचा जीवाणू आढळल्यानंतर पाण्याचा वापर न करण्याचा सल्ला लेक जॅक्सन, फ्रीपोर्ट, अँगलटन, ब्राजोरिया, रिचवूड, आयस्टर क्रिक, क्लूट आणि रोजनबर्ग परिसरासाठी जारी करण्यात आली आहे. टेक्सार प्रांतातील डाऊ केमिकल प्लँट आणि क्लेमेंस आणि वायने स्कॉट टेक्सास डिपार्टच्या क्रिमिनल जस्टिस येथे पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी अ‍ॅडव्हायजरी जारी करण्यात आली आहे. अमिबायुक्त पाण्याच्या वापरामुळे संकटाची शक्यता लेक जॅक्सन परिसरासाठी जारी करण्यात आली आहे.

पाण्यामध्ये अमिबा सापडण्याचे प्रकार ८ सप्टेंबरपासून सुरू झाले होते. पाण्यामध्ये अमिबा असल्याची बाब एका सहा वर्षांच्या मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर समोर आली होती.

इतर महत्त्वाच्या बातम्या

तेव्हा खुद्द नेहरूंनी दिली होती मनमोहन सिंग यांना राजकारणात येण्याची ऑफर...

श्वसनाचे विकार असणाऱ्यांवर १०० टक्के प्रभावी ठरणार नाही कुठलीही लस, ICMR च्या संचालकांच्या विधानाने वाढली चिंता

आधी झाला असेल हा आजार, तर तो कोरोनाविरोधात लढण्यास ठरेल मदतगार

ही पथ्यं पाळा आणि तंदुरुस्त व्हा, कोरोनामुक्त रुग्णांना आरोग्य मंत्रालयाने दिले १० खास सल्ले

शेतकऱ्यांसाठी सरकारने आणली भरघोस नफा मिळवून देणारी योजना, मिळेल ८० टक्क्यांपर्यंत सब्सिडी

पँगाँगमध्ये चिनी सैन्याला सळो की पळे करणाऱ्या स्पेशल फ्रंटियर फोर्सची ही आहे खास वैशिष्टे

Web Title: Human brain-eating amoeba found in water in US, issued warning instructions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.