सावधान! चीनमध्ये वेगात पसरतोय 'कोरोन वायरस'चा धोका; संपूर्ण देशात अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 12:44 PM2020-01-21T12:44:06+5:302020-01-21T12:53:47+5:30

संपूर्ण चीनमध्ये अद्याप कोरोन वायरसमुळे पीडित लोकांचा आकडा २०० च्या वर गेला आहे.

Human-to-human transmission in China confirms corona virus | सावधान! चीनमध्ये वेगात पसरतोय 'कोरोन वायरस'चा धोका; संपूर्ण देशात अलर्ट

सावधान! चीनमध्ये वेगात पसरतोय 'कोरोन वायरस'चा धोका; संपूर्ण देशात अलर्ट

Next

पेइचिंग - चीनमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोन वायरस नावाचा आजार लोकांमध्ये पसरत असल्यामुळे सर्वांमध्ये भीतीचं वातावरण आहे. कमी कालावधीत जास्तीत जास्त लोक या आजाराने ग्रस्त होत असल्याने चीन सरकारकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. या वायरसमुळे माणसाला श्वास घेण्यास त्रास होत असल्याचं डॉक्टरांनी सांगितले. हा वायरस कुटुंबामध्ये मोठ्या प्रमाणात पसरत असून यामध्ये काही डॉक्टरांनाही याची लागण झाल्याची माहिती चीनमधील वृत्तपत्रांनी दिली आहे. 

संपूर्ण चीनमध्ये अद्याप कोरोन वायरसमुळे पीडित लोकांचा आकडा २०० च्या वर गेला आहे. या विषाणूचा धोका टाळण्यासाठी सरकारकडून विविध प्रयत्न सुरु आहेत. चीनचे राष्ट्रपती शी चिनफिंग यांनी सांगितले आहे की, 'वुहान आणि इतर ठिकाणांवर नुकत्याच झालेल्या नवीन कोरोन वायरस न्यूमोनियाची दखल गंभीरतेने घेणे गरजेचे आहे. सर्व सरकारी कार्यालये, दवाखाने संबंधित विभागांनी लोकांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्राधान्य द्यायला हवं. 

Image result for कोरोना वायरस

हा संसर्गजन्य विषाणू असल्यामुळे चीनमधून हा वायरस इतर देशांमध्ये पसरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. २५ जानेवारीपासून चीनमध्ये नवीन वर्ष सुरु होणार आहे. यावेळी अनेकांना सुट्टी असल्याने ते इतर देशात फिरण्यासाठी जातात. थायलँड आणि जपानमध्येही कोरोन वायरसची तीन प्रकरणे पुढे आली आहेत. साउथ कोरियामध्येही सोमवारी या वायरसचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. ३५ वर्षाची चीनी महिला वुहानमधून सियोलला आली होती. अमेरिकेतील विमानतळावरही चीनमधून येणाऱ्या पर्यटकांची कसून तपासणी करण्यात येत आहे. 

Image result for कोरोना वायरस

वुहानमधून पसरतोय कोरोन वायरस
वुहानमध्ये मागील महिन्यात हा वायरस पसरला. सरकारने याठिकाणी लोकांना आवाहन केले आहे की, ज्यांना ताप आला आहे त्यांनी त्वरीत रुग्णालयात जाऊन तपासणी करावी. वुहानमध्ये आतापर्यंत १३६ जणांना या आजाराची लागण झाली आहे. तीन जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. वुहानमधून हा वायरस चीनच्या दुसऱ्या शहरातही पसरल्याची माहिती आहे. एका भारतीय महिला शिक्षिकेला या वायरसची लागण झाल्याची माहिती आहे. 

Image result for कोरोना वायरस

कोरोन वायरस म्हणजे काय?
WHO नुसार कोरोन वायरस सी-फूडमुळे तसेच उंट, मांजर आणि अन्य प्राण्यांमुळे होतो. प्राण्यांमध्ये आढळणारा विषाणू मनुष्यात पसरल्यामुळे हा मानवी संसर्गाने लोकांमध्ये पसरला आहे. 

कोरोन वायरसची लक्षणे 
सर्दी, श्वास घेण्यास त्रास, ताप येणे अशी प्राथमिक लक्षणे असून त्याचा परिणाम न्युमोनिया आणि किडनी यांना नुकसानदायक आहे. 
 

Web Title: Human-to-human transmission in China confirms corona virus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.