अपहृत भारतीयांची मानवी ढाल करणार
By admin | Published: June 23, 2014 04:50 AM2014-06-23T04:50:18+5:302014-06-23T04:50:18+5:30
इराकचे सैन्य वा अमेरिकेने हवाई हल्ला केल्यास स्वत:च्या संरक्षणासाठी आयएसआयएस दहशतवादी ताब्यात असलेल्या ३९ भारतीय अपहृतांचा उपयोग मानवी ढाल
नवी दिल्ली : इराकचे सैन्य वा अमेरिकेने हवाई हल्ला केल्यास स्वत:च्या संरक्षणासाठी आयएसआयएस दहशतवादी ताब्यात असलेल्या ३९ भारतीय अपहृतांचा उपयोग मानवी ढाल म्हणून करणार असल्याचे या दहशतवाद्यांच्या ताब्यातून सुटका करून घेणाऱ्या भारतीय कामगाराने सरकारी अधिकाऱ्यांना सांगितले आहे.
अपहृतांच्या स्थितीबद्दल भारत सरकारला फारशी माहिती नाही; पण दहशतवाद्यांच्या ताब्यातून सुटलेला हरजित सिंग सध्या कुर्दीश अधिकाऱ्यांच्या ताब्यात सुखरूप असून, त्याने दिलेल्या माहितीनुसार, जर इराक सरकारने लष्करी कारवाई केली किंवा अमेरिकेने हवाई हल्ला केला, तर भारतीय ओलिसांना सर्वात पुढे उभे केले जाईल. सिंग बांगलादेशी गटात शिरला व पळताना काटेरी तारांच्या कुंपणावरून उडी मारली होती. ओलीस ठेवलेल्या लोकांना शस्त्रे वाहून नेणारे हमाल म्हणून वापरले जात असल्याचेही सिंग याने सांगितले. सिंग याने बांगलादेशी मित्राचा भारतीय दूतावासाशी संपर्क साधला होता. (लोकमत न्यूज नेटवर्क)