चाचण्यांसाठी वापरता येईल अशी मानवी त्वचा बनणार
By admin | Published: January 31, 2017 12:26 AM2017-01-31T00:26:44+5:302017-01-31T00:26:44+5:30
प्रत्यारोपण, कॉस्मेटिक आणि औषधी उत्पादनांच्या चाचण्या घेण्यासाठी वापरता येईल अशी मानवी त्वचा तयार करणारे नवे थ्रीडी बायोप्रिंटर शास्त्रज्ञांनी प्रथमच विकसित केले
लंडन : प्रत्यारोपण, कॉस्मेटिक आणि औषधी उत्पादनांच्या चाचण्या घेण्यासाठी वापरता येईल अशी मानवी त्वचा तयार करणारे नवे थ्रीडी बायोप्रिंटर शास्त्रज्ञांनी प्रथमच विकसित केले आहे. या बायोप्रिंटरचा उपयोग करून तयार केलेली पहिली जिवंत मानवी त्वचा बाजारात उपलब्ध होणार आहे, असे संशोधकांनी सांगितले. ही त्वचा त्वचेच्या नैसर्गिक रचनेसारखीच आहे. ती बाहेरील पर्यावरणापासून मानवाचे संरक्षण करते. ही नवी त्वचा प्रत्यारोपणासाठी किंवा रासायनिक उत्पादनाच्या चाचणीच्या प्रयोगांसाठी, कॉस्मेटिक्स किंवा औषधी उत्पादनांच्या चाचण्यांसाठी वापरता येईल, असे युनिव्हरसीदाद कार्लोस इल दे माद्रिदमधील प्रोफेसर जोस लुईस जोरकॅनो यांनी सांगितले.