मानवी तस्करीचा सूत्रधार पकडला
By admin | Published: September 19, 2015 02:24 AM2015-09-19T02:24:20+5:302015-09-19T02:24:20+5:30
बांगलादेशमधिल रोहिंग्यांची मलेशिया, थायलंड तसेच इतर आग्नेय आशियातील देशात तस्करी करणाऱ्या मोहिमांच्या मुख्य सूत्रधारास अटक करण्यात आली आहे.
ढाका: बांगलादेशमधिल रोहिंग्यांची मलेशिया, थायलंड तसेच इतर आग्नेय आशियातील देशात तस्करी करणाऱ्या मोहिमांच्या मुख्य सूत्रधारास अटक करण्यात आली आहे. दिल मोहम्मद नामक व्यक्तीला मलेशियातून परत आल्यावर तात्काळ अटक करण्यात आली.
तस्करांना पकडण्यासाठी बांगलादेश तसेच म्यानमारवर थायलंड आणि मलेशियाचा दबावही होता. यासर्व पार्श्वभूमीवर ही अटक करण्यात आलेली आहे. मोहम्मदला अटक केल्यानंतर पोलीस निरिक्षक कबिर हुसैन म्हणाले, मान्सून संपल्यानंतर मानवी तस्कर पुन्हा घरी परतत आहेत.
काही आठवड्यांमध्ये समुद्र शांत होईल आणि पुन्हा थायलंड, मलेशियाच्या दिशेने हे तस्कर लोकांना नेण्याचे प्रयत्न सुरु करतील. अशाच प्रयत्नात असणाऱ्या मोहम्मदला पकडण्यात यश आले आहे.