मानवी कवट्यांची तस्करी, नेपाळमध्ये भारतीयाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2017 01:22 AM2017-05-04T01:22:13+5:302017-05-04T01:22:13+5:30
भागीरथ सिंह (६६, रा. खोरीबारी, पश्चिम बंगाल) या भारतीय नागरिकाला १५ मानवी कवट्यांच्या तस्करीप्रकरणी अटक झाल्याची
Next
काठमांडू : भागीरथ सिंह (६६, रा. खोरीबारी, पश्चिम बंगाल) या भारतीय नागरिकाला १५ मानवी कवट्यांच्या तस्करीप्रकरणी अटक झाल्याची माहिती पोलिसांनी बुधवारी येथे दिली.
भागीरथ सिंह याला अज्ञात व्यक्तीने कवट्यांच्या तस्करीसाठी एक हजार रुपये दिले. या कवट्यांची तस्करी तांत्रिक विधींतील वापरासाठी झालेली असू शकते, असे पोलीस अधीक्षक शैलेश थापा म्हणाले. काठमांडूपासून सुमारे ४५० किलोमीटरवरील झापा जिल्ह्यात सोमवारी काकरभिट्टा कस्टम्स कार्यालयानजीक सुरक्षा तपासणीत भागीरथ सिंह याला पोलिसांनी पकडले. नेपाळी आणि भारतीय नागरिक आसाम, मेघालय आणि मिझोराममधून मानवी कवट्यांची तस्करी नेपाळमध्ये करतात.