मलेशियात पुराने दीड लाख बेघर

By admin | Published: December 28, 2014 02:15 AM2014-12-28T02:15:09+5:302014-12-28T02:15:09+5:30

मलेशिया गेल्या अनेक दशकातील भीषण पुराचा सामना करीत असून यात आतापर्यंत ८ जणांचा बळी गेला आहे

Hundred and a half million homeless in Malaysia | मलेशियात पुराने दीड लाख बेघर

मलेशियात पुराने दीड लाख बेघर

Next

क्वालालंपूर : मलेशिया गेल्या अनेक दशकातील भीषण पुराचा सामना करीत असून यात आतापर्यंत ८ जणांचा बळी गेला आहे. देशातील दीड लाखाहून अधिक नागरिकांना पुरामुळे बेघर व्हावे लागले आहे. पुरामुळे लाखो लोक जीव मुठीत धरून जगत असताना अमेरिकी राष्ट्रध्यक्ष बराक ओबामा यांच्यासोबत गोल्फ खेळत असतानाची छायाचित्रे वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केल्यानंतर जंग यांना मायदेशी परतावे लागले. पूर्व किनाऱ्यावरील केलान्तान प्रांताला पुराचा सर्वाधिक फटका बसला. देशातून टीकेची झोड उठल्यानंतर मायदेशी परतताच जंग यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा केला.

४ राज्यांना फटका. केलान्तान, तेरेन्गानू, पहांग आणि पेराक.
१ तासात ११३ मि.लि. पाऊस.
३.६ मीटरच्या लाटा

४४ मदत केंद्रांमध्ये कुआंग्टानमधील १९,९२४ नागरिकांना निवारा देण्यात आला आहे.

१०० परदेशी पर्यटकांना दुर्गम भागातून सुरक्षित स्थळी हलविले.

Web Title: Hundred and a half million homeless in Malaysia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.