अफगाणिस्तानमध्ये शंभरावर नागरिकांची गोळ्या घालून हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2021 06:28 AM2021-07-24T06:28:10+5:302021-07-24T06:28:53+5:30
अफगाणिस्तानात अमेरिकी फौजेमध्ये दुभाष्या म्हणून काम करणाऱ्या सोहेल पारदीस या व्यक्तीचा तालिबानी दहशतवाद्यांनी शिरच्छेद केला.
काबूल :अफगाणिस्तानातील स्पिन बोल्दाक जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांत अज्ञात सशस्त्र व्यक्तींनी शंभरहून अधिक नागरिकांना गोळ्या घालून ठार केले आहे. हे कृत्य तालिबानी दहशतवाद्यांनी पाकिस्तानातील त्यांच्या नेत्यांच्या इशाऱ्यावरून केल्याचा आरोप अफगाणिस्तान सरकारने केला आहे.
पाकिस्तानातील पंजाब प्रांतात तालिबानींचे काही नेते राहात असून, त्यांच्याच आदेशानुसार स्पिन बोल्दाकमधील १००हून अधिक नागरिकांची कोणत्याही कारणांशिवाय हत्या करण्यात आली. या कृत्यामुळे शत्रूचा क्रूर चेहरा पुन्हा उघड झाला आहे.
दुभाष्याचा केला शिरच्छेद
- अफगाणिस्तानात अमेरिकी फौजेमध्ये दुभाष्या म्हणून काम करणाऱ्या सोहेल पारदीस या व्यक्तीचा तालिबानी दहशतवाद्यांनी शिरच्छेद केला.
- अमेरिकी फौजेसाठी शेकडो अफगाणिस्तानी नागरिकांनी दुभाष्या म्हणून काम केले आहे. तालिबानी दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानातील काही भागांवर कब्जा केला आहे.
- तिथे अमेरिकी लष्कराला मदत केलेल्या लोकांना वेचून ठार मारण्याची योजना तालिबानींनी तयार केली आहे.