बांगलादेशात अनेक मंदिरांसह शेकडो घरांची तोडफोड

By admin | Published: October 31, 2016 04:02 PM2016-10-31T16:02:42+5:302016-10-31T16:02:42+5:30

बांगलादेशमधील चितगाव येथे हिंदूंच्या अनेक मंदिरांची आणि घऱांची तोडफोड करण्यात आली आहे.

Hundreds of families including many temples in Bangladesh collapsed | बांगलादेशात अनेक मंदिरांसह शेकडो घरांची तोडफोड

बांगलादेशात अनेक मंदिरांसह शेकडो घरांची तोडफोड

Next
>ऑनलाइन लोकमत 
ढाका, दि. 31 -  बांगलादेशमधील चितगाव येथे हिंदूंच्या अनेक मंदिरांची आणि घऱांची तोडफोड करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार 15 मंदिरे आणि शेकडो घरांचे या तोडफोडीत नुकसान झाले आहे. ही घटना रविवारी घडली असून,  फेसबूकवर एक मशिदीबाबत आक्षेपार्ह शब्दाचा वापर करण्यात आल्याने हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे.  
मशिदीबाबत आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्याला मृत्युदंड देण्यात यावा अशी मागणा करत रविवारी हजारो लोकांनी एक मोर्चा काढला होता. त्यादरम्यान, 150 ते 200 लोकांनी परिसरातील 5 मंदिरातील 7 मूर्तींची तोडफोड केली, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली. या तोडफोडीदरम्यान काही जण जखमी झाले असून, सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान,  जमावाने 15 हिंदू मंदिरांना लक्ष्य करत दोन घरांतील ऐवज लुटल्याचा आरोप नासीरनगर पूजा समितीचे महासचिव खैलपादा पोद्दार यांनी केला.  
(भारत-बांगलादेश सीमा बंद करणार)
(भारत आणि बांगलादेश 1971च्या स्वातंत्र्य लढ्यावर बनवणार माहितीपट!)

Web Title: Hundreds of families including many temples in Bangladesh collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.