शेकडो रुग्णालयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2015 11:58 PM2015-06-28T23:58:38+5:302015-06-28T23:58:38+5:30
तैवानच्या वॉटर पार्कमध्ये शनिवारी रात्री संगीत कार्यक्रमावेळी आग लागल्यानंतर ४०० हून अधिक जणांना आतापर्यंत रुग्णालयात दाखल केली आहे.
ताईपे : तैवानच्या वॉटर पार्कमध्ये शनिवारी रात्री संगीत कार्यक्रमावेळी आग लागल्यानंतर ४०० हून अधिक जणांना आतापर्यंत रुग्णालयात दाखल केली आहे. यापैकी अनेक जण गंभीररीत्या भाजले आहेत. या आगीत एकूण ५१९ जण जखमी झाले आहेत. सुमारे १,००० दर्शकांमध्ये रंगीत पावडर फेकण्यात आली. मात्र, तिचा स्फोट झाला व आग लागली. पावडरसोबतच ही आग जमिनीवरही पसरली. यामुळे प्रेक्षकांचा मुख्यत: खालचा भाग जळाला आहे.
राष्ट्राध्यक्ष मा यिंह जियू यांनी रविवारी दुपारी रुग्णालयात जाऊन पीडितांची विचारपूस केली. पीडितांना सर्वोत्तम वैद्यकीय उपचार दिले जातील, असे आश्वासन त्यांनी दिले.