अन्न मिळविण्यासाठी शेकडो लोक उतरले समुद्रात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2024 08:11 IST2024-03-04T08:10:48+5:302024-03-04T08:11:12+5:30
...दरम्यान, संयुक्त राष्ट्रांच्या म्हणण्यानुसार गाझाची २२ लाखांहून अधिक लोकसंख्या उपासमारीच्या उंबरठ्यावर आहे.

अन्न मिळविण्यासाठी शेकडो लोक उतरले समुद्रात
जेरूसलेम : युद्धादरम्यान अमेरिकेने प्रथमच गाझाला मदत दिली आहे. अमेरिकी लष्करी विमानाने पॅलेस्टिनींसाठी पॅराशूटद्वारे खाद्यपदार्थांचे बॉक्स टाकले. ते मिळवण्यासाठी लोक समुद्रात उतरले. दरम्यान, संयुक्त राष्ट्रांच्या म्हणण्यानुसार गाझाची २२ लाखांहून अधिक लोकसंख्या उपासमारीच्या उंबरठ्यावर आहे.
१ मार्च रोजी अन्न घेण्यासाठी आलेल्या लोकांवर इस्रायली सैनिकांनी गोळीबार केला होता. त्यात ११२ जण ठार झाले. या पार्श्वभूमीवर अमेरिकेने मदत देण्याचा निर्णय घेतला. ज्या ठिकाणी गोळीबार झाला ते ठिकाण समुद्राजवळ होते. ज्या ट्रकमधून मदत सामग्री आली होती, त्याच ट्रकमध्ये मृतदेह नेण्यात आले. ७ युद्धात आतापर्यंत ३० हजारांहून अधिक पॅलेस्टिनी मारले गेले आहेत.