अमेरिकेत शेकडो विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर मेल धडकले; व्हिसा रद्द, स्वत:हून चालते व्हा... खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 16:03 IST2025-03-30T16:02:54+5:302025-03-30T16:03:09+5:30

अमेरिकेत शिकणाऱ्या शेकडो परदेशी विद्यार्थ्यांना अमेरिकी परराष्ट्र खात्याकडून एक धक्कादायक मेल प्राप्त झाला आहे.

Hundreds of students in America receive mail on their mobile phones; Visas cancelled, self-imposed... stir | अमेरिकेत शेकडो विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर मेल धडकले; व्हिसा रद्द, स्वत:हून चालते व्हा... खळबळ

अमेरिकेत शेकडो विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर मेल धडकले; व्हिसा रद्द, स्वत:हून चालते व्हा... खळबळ

अमेरिकेत लाखो रुपये खर्चून शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. अमेरिकेत शिकणाऱ्या शेकडो परदेशी विद्यार्थ्यांना अमेरिकी परराष्ट्र खात्याकडून एक धक्कादायक मेल प्राप्त झाला आहे. यामध्ये त्यांचा व्हिसा रद्द झाल्याचे सांगण्यात आले असून स्वत:हून मायदेशात परतण्यास सांगण्यात आले आहे. 

यामध्ये असे विद्यार्थी आहेत जे कॉलेज कॅम्पसमध्ये कोणत्या ना कोणत्या आंदोलनात किंवा अन्य काही गोष्टींमध्ये सहभागी होते. सोशल मीडियावर ज्या गोष्टी राष्ट्रविरोधी म्हणून नोंदविल्या गेल्या आहेत त्यातील सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांची ओळख पटवून त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वत:हून डिपोर्ट होण्यास सांगितले आहे. 

ज्या लोकांनी थेट आंदोलनांमध्ये भाग घेतला आहे त्याच लोकांना हे मेल आले नसून ज्यांनी सोशल मीडियावर राजकीय पोस्ट करत होते किंवा अशा पोस्टना लाईक, कमेंट करत होते त्या सर्वांना या कारवाईत घेण्यात आले आहे. 

एफ-१ व्हिसा हा एक नॉन-इमिग्रंट व्हिसा आहे जो आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना अमेरिकेत शिक्षण घेण्याची परवानगी देतो. या व्हिसासाठी विद्यार्थ्यांना मान्यताप्राप्त संस्थेत पूर्णवेळ अभ्यासक्रमात प्रवेश घ्यावा लागतो आणि त्यांच्याकडे त्यांचे शिक्षण आणि राहण्याचा खर्च भागविण्यासाठी पुरेसे आर्थिक संसाधने आहेत याची खात्री करावी लागते.

या मेलवर परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिकेत कोण येईल आणि कोण येणार नाही हे ठरवण्याचा अधिकार अमेरिकेला आहे. "कॅच अँड रिव्होक" नावाचे एआय-आधारित अॅप लाँच केले आहे, जे विद्यार्थ्यांच्या सोशल मीडियामधील गोष्टींवर लक्ष ठेवणार आहे. या अॅपद्वारे दहशतवादी संघटनांना पाठिंबा देण्याचा संशय असलेल्या विद्यार्थ्यांचे व्हिसा रद्द करते, असे ते म्हणाले. 

Web Title: Hundreds of students in America receive mail on their mobile phones; Visas cancelled, self-imposed... stir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.