VIDEO: कोरोनाचा माकडांना फटका; एका केळ्यावरुन भररस्त्यात राडा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2020 03:55 PM2020-03-12T15:55:13+5:302020-03-12T16:00:19+5:30

अन्नपदार्थ मिळत नसल्यानं माकडं आक्रमक; स्थानिकांमध्ये घबराट

Hundreds of wild monkeys terrorise Thai city in search of food after coronavirus drives tourists away kkg | VIDEO: कोरोनाचा माकडांना फटका; एका केळ्यावरुन भररस्त्यात राडा

VIDEO: कोरोनाचा माकडांना फटका; एका केळ्यावरुन भररस्त्यात राडा

Next
ठळक मुद्देकोरोनाचा माकडांनाही फटका; खाद्यपदार्थांची टंचाईपर्यटकांची संख्या घटल्यानं माकडांना अन्न मिळेनाएका केळ्यासाठी शेकडो माकडांचं भांडण

लोपबुरी: कोरोनानं जगभरात थैमान घातलंय. जवळपास सर्वच अर्थव्यवस्थांना कोरोनाचा फटका बसलाय. कोरोनामुळे दररोज शेअर बाजारांमध्ये पडझड पाहायला मिळतेय. मात्र थायलंडमध्ये कोरोनाचा फटका चक्क माकडांना सहन करावा लागतोय. कोरोनामुळे थायलंडमध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या रोडावलीय. त्यामुळे खाद्यपदार्थांसाठी माकडांमध्ये तुफान भांडणं होताना दिसताहेत. 

मध्य थायलंडच्या लोपबुरी भागात कायम पर्यटकांची वर्दळ असते. मात्र कोरोनामुळे थायलंडमध्ये येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय घट झालीय. या भागात येणारे पर्यटक इथल्या माकडांना विविध पदार्थ खायला देतात. मात्र पर्यटकांची संख्या घटल्यानं माकडांचे हाल सुरू आहेत. त्यामुळे अन्नपदार्थांवरुन माकडांमध्ये दररोज भांडणं होत आहेत. शेकडो माकडं एका केळ्यासाठी भांडत असल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 



सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये शेकडो माकडं एका माकडाच्या मागे धावताना दिसत आहेत. एका माकडाच्या हातात असलेलं केळ हिसकावण्यासाठी सर्व माकडांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी माकडं रस्त्यावर धावत आहेत. केळ हिसकावण्यासाठी माकडं उड्या मारताना दिसत आहेत. माकडांचा हा आक्रमक अवतार स्थानिकांनाही धक्का बसला. माकडांना अशा प्रकारे कधीही आक्रमक होताना पाहिलं नसल्याची प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केलीय. 

Web Title: Hundreds of wild monkeys terrorise Thai city in search of food after coronavirus drives tourists away kkg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.