अ‍ॅपल वॉचची कमाल! पतीने पत्नीला जिवंत पुरले, पण वॉचने वाचवला जीव, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2022 12:36 PM2022-10-23T12:36:21+5:302022-10-23T12:41:37+5:30

अमेरिकेतील वाशिंग्टनमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पतीने आपल्या पत्नीला ठार मारण्याचा प्रयत्न केला, पण शेवटच्या क्षणी या महिलेचा जीव वाचल्याचे समोर आले. आता या प्रकरणी महिलेने गुन्हा दाखल केला. पती पत्नी वादामुळे वेगवेगळे राहत होते.

Husband Buries Wife Alive But Apple Watch Saves Life in america | अ‍ॅपल वॉचची कमाल! पतीने पत्नीला जिवंत पुरले, पण वॉचने वाचवला जीव, वाचा सविस्तर

अ‍ॅपल वॉचची कमाल! पतीने पत्नीला जिवंत पुरले, पण वॉचने वाचवला जीव, वाचा सविस्तर

Next

अमेरिकेतील वाशिंग्टनमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पतीने आपल्या पत्नीला ठार मारण्याचा प्रयत्न केला, पण शेवटच्या क्षणी या महिलेचा जीव वाचल्याचे समोर आले. आता या प्रकरणी महिलेने गुन्हा दाखल केला. पती पत्नी वादामुळे वेगवेगळे राहत होते. पतीने पत्नीला ठार मारण्याचा प्लॅन बनवला होता. पण शेवटच्या क्षणी ही महिला वाचली, महिलेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या महिलेचा जीव डिजीटल वॉचमुळे वाचला असल्याचे सांगण्यात येत आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पतीने पत्नीचे अपहरण करुन जंगलात घेऊन गेला. महिलेवर चाकूने वार करत गंभीर जखमी केले. या मारहाणीत महिला बेशुद्ध झाली. बेशुद्ध झाल्यानंतर पतीने पत्नीला जीवंत पुरले. यानंतर पती काहीवेळाने फरार झाला.       

यावेळी महिलेच्या तोंडही पॅक केले होते, त्यामुळे महिलेला आरडाओरड करता येत नव्हती. पतिने महिलेचे अपहरण केल्यानंतर  तिच्या अॅपल वॉचवरून पोलिसांना ९११ वर कॉल केला होता. यानंतर पतीने पत्नीला गॅरेजमध्ये ओढले आणि तिच्या हातात असणारे अॅपल वॉच फोडले.मात्र तोपर्यंत पोलीस सतर्क झाले होते. पोलिसांनी तेव्हापासूनच महिलेचा शध घेण्यास सुरूवात केली होती. 

महिलेने सांगितले की, ती कित्येक तास त्या खड्ड्यात पडून होती. यावेळी तिने हवा येण्यासाठी हालचाल करुन जागा केली. महिलेने अंधार पडल्यानंतर त्या खड्ड्यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न केला. ती त्या खड्ड्यातून बाहेर येण्यास यशस्वी झाली.बाहेर आल्यानंतर तिने पोलिसांना फोन केला. पोलिसांनी घचनास्थळी येऊन त्या महिलेला रुग्णालयात दाखल केले. 

 

'भारताला कोणाचेही ऐकण्याची...; पाकिस्तानच्या धमकीला क्रीडामंत्री अनुराग ठाकुरांनी दिले प्रत्युत्तर

तिच्या पतीने यापूर्वी तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती. तिचा नवरा तिच्याकडे पैशांची मागणी करत होता. 

Web Title: Husband Buries Wife Alive But Apple Watch Saves Life in america

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.