अरे देवा! बायको ब्युटी पार्लरमध्ये गेली म्हणून नवरा संतापला; सर्वांसमोर केली भयंकर शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 01:54 PM2022-08-18T13:54:30+5:302022-08-18T14:02:39+5:30
पत्नी पार्लरमध्ये गेल्याचं समजताच पती संतप्त झाला. त्याने सर्वांसमोर बायकोला मारहाण करायला सुरुवात केली.
आपण आणखी सुंदर दिसावं म्हणून खासकरून महिला ब्युटी पार्लरमध्ये जातात. पण पार्लरमध्ये जाणं एका महिलेला चांगलंच महागात पडलं आहे, पत्नी पार्लरमध्ये गेली म्हणून संतापलेल्या एका पतीने तिला भयंकर शिक्षा दिल्याची घटना समोर आली आहे. पत्नी पार्लरमध्ये गेल्याचं समजताच पती संतप्त झाला. त्याने सर्वांसमोर बायकोला मारहाण करायला सुरुवात केली. नवऱ्याने बायकोसोबत केलेल्या संतापजनक कृत्याचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये पती पत्नीला मारहाण करताना दिसत आहे. त्याला मारताना पाहून तिथे असलेल्या ब्युटिशिअन आणि इतर महिला ग्राहकही घाबरतात. पण कुणाचीही त्या व्यक्तीला रोखण्याची हिंमत होत नाही. सर्वजणी त्यांच्यांपासून दूर पळतात कुणीच त्यांच्या जवळ जात नाही, त्या व्यक्तीला रोखण्याचा प्रयत्न करत नाही. तुर्कमेनिस्तानच्या अश्गाबातजवळील क्योशीमध्ये ही घटना आहे.
तुर्कमेनिस्तान सरकारने महिलांच्या अधिकाऱ्यांवर बऱ्याच मर्यादा आणल्या आहेत. रिपोर्टनुसार महिलांसाठी ब्यूटी सलूनमध्ये जाणंही धोकादायक झालं आहे. ब्युटिशिअन्स आपलं काम अंडरग्राऊंड पद्धतीने करतात. जर याची माहिती सरकारला मिळाली तर त्यांना जेलमध्येही पाठवलं जातं.
महिलांना ब्युटी पार्लरमध्ये पकडल्यानंतर त्यांचे पती किंवा वडिलांकडून दंड आकारला जाऊ शकतो. हा दंड इतका असतो की काही महिन्यांचा पगार यामध्ये जाते. रिपोर्टनुसार अधिकाऱ्यांनी अशा सलूनवर छापाही टाकला आहे. ब्युटी प्रोडक्ट्सचा वापर करणाऱ्या काही महिलांना खूप वेगळ्या दिसतात म्हणून त्यांना अटक केली होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.