किचनमध्ये सीक्रेट कॅमेरा लावून पतीने डॉक्टर पत्नीला पकडलं रंगेहाथ!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 03:12 PM2022-08-10T15:12:15+5:302022-08-10T15:12:27+5:30
जॅक काही दिवसांपासून आजारी होता. त्यांना संशय आला की, पत्नी त्यांच्या ड्रिंकमध्ये नाली साफ करण्यासाठी वापरलं जाणारं Drano हे विषारी केमिकल मिक्स करत आहे.
एका पतीला संशय आला की, पत्नी त्याच्या ड्रिंकमध्ये विषारी पदार्थ मिक्स करून त्याला देत आहे. त्यानंतर त्याने लपून घरातील किचनमध्ये एक कॅमेरा लावला आणि पत्नीला रंगेहाथ पकडलं. ही माहीत कोर्टात एका केससाठी जमा करण्यात आलेल्या कागदपत्रांमधून समोर आली आहे. ही घटना अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील आहे. न्यूयॉर्क पोस्टला मिळालेल्या कागदपत्रांनुसार, स्कीन स्पेशालिस्ट डॉक्टर यू एमिली यूवर लक्ष ठेवण्यासाठी तिचा पती जॅक चेनने किचनमध्ये लपून कॅमेरा लावला. ते दोघेही 10 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते.
जॅक काही दिवसांपासून आजारी होता. त्यांना संशय आला की, पत्नी त्यांच्या ड्रिंकमध्ये नाली साफ करण्यासाठी वापरलं जाणारं Drano हे विषारी केमिकल मिक्स करत आहे.
जॅकने पोलिसांना हे सीसीटीव्ही फुटेज दिलं. यानंतर एमिलीला तिच्याच ऑफिसमधून 4 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली. त्यानंतर साधारण 24 लाखांच्या बॉन्डवर तिला सोडण्यात आलं. रिपोर्टनुसार, जॅकचा दावा आहे की, पत्नी त्याना आणि मुलांना बऱ्याच दिवसांपासून शारीरिक व मानसिक त्रास देत होती.
जॅकने कोर्टात सांगितलं की, एमिलीला जेव्हा राग येतो तेव्हा ती मुलांवर ओरडू लागते. सामान्यपणे एमिली मुलांना शिव्याही देत होती. पोलिसांनी सांगितलं की, नाली साफ करणारं केमिकल प्यायल्याने शरीराच्या आत जॅकचं मोठं नुकसान होत होतं. जॅकने मागणी केली त्याना आता घटस्फोट हवा आहे.
2011 मध्ये जॅकची भेट एमिलीसोबत झाली होती आणि दुसऱ्या वर्षी दोघांनी लग्न केलं होतं. जॅकने दावा केला की, 2013 आणि 2014 मध्ये दोन मुलांच्या जन्मानंतर त्यांना एमिलीमध्ये बदल दिसून येत होता. जॅकने हेही सांगितलं की, बऱ्याच महिन्यांपासून दोन्ही मुलांना त्रास दिला जात आहे.