मुलाचं तिकीट काढावं लागू नये म्हणून पती-पत्नीने विमानतळावर सोडलं बाळाला, पळून गेले अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2023 04:59 PM2023-02-03T16:59:51+5:302023-02-03T17:00:16+5:30
मुलाचं वेगळं तिकीट खरेदी करण्यावरून वाद झाल्यानंतर एका जोडप्याने बाळाला विमानतळावरील चेक-इन काउंटरवर सोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मुलाचं वेगळं तिकीट खरेदी करण्यावरून वाद झाल्यानंतर एका जोडप्याने आपल्या बाळाला इस्रायल विमानतळावरील चेक-इन काउंटरवर सोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रिपोर्टनुसार, ही घटना रायनियर एअर डेस्कच्या तेल अवीव बेन-गुरियन विमानतळावर घडली. मुलाकडे तिकीट नव्हतं आणि पालक मुलाशिवाय फ्लाइटमध्ये चढले. स्थानिक वृत्त आउटलेट्सनुसार, ही जोडी बेल्जियन पासपोर्टवर ब्रसेल्सला जात होती जेव्हा त्यांना कळले की त्यांना मुलाच्या तिकिटासाठी अतिरिक्त पैसे द्यावे लागतील.
रायनियर एयरने सांगितले की या जोडप्याने मुलाचे तिकीट आधी खरेदी केले नव्हते. विमानतळ कर्मचार्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी आपल्या मुलाला डेस्कजवळ बेबी स्ट्रॉलरमध्ये सोडले आणि पासपोर्ट नियंत्रणासाठी पुढे गेले. CNN ला दिलेल्या निवेदनात, एअरलाइनने म्हटले आहे की, "तेल अवीव ते ब्रुसेल्स (31 जानेवारी) प्रवास करणाऱ्या या प्रवाशांनी आपल्या मुलाचं बुकिंग न करता चेक-इन केले."
"कपलने मुलाला चेक-इनवर सोडले आणि पुढे गेले. चेक-बेन गुरियन विमानतळावर, एजंटने विमानतळ सुरक्षेशी संपर्क साधला, ज्यांनी या प्रवाशांना परत बोलावले आणि हे प्रकरण स्थानिक पोलिसांकडे पाठवले." याच दरम्यान, इस्रायल विमानतळाच्या सुरक्षा कर्मचार्यांनी आउटलेटला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "बेल्जियन पासपोर्ट असलेले जोडपे एका मुलासह टर्मिनल 1 वर त्यांच्या मुलाच्या तिकिटाशिवाय फ्लाइटसाठी आले होते. जोडप्याला फ्लाइटसाठी उशीर झाला होता."
"जोडप्याने बाळाची ट्रॉली बाळासह तेथेच सोडली आणि फ्लाइटसाठी बोर्डिंग गेटवर जाण्याच्या प्रयत्नात टर्मिनल 1 च्या दिशेने धाव घेतली." पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत प्रकरण निवळल्याचे पोलिसांनी सांगितले. ते म्हणाले की, मूल आई-वडिलांकडे आहे त्यामुळे आता पुढील तपास होणार नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"