Imran Khan Pakistan : “मी अमेरिका विरोधी नाही,” इम्रान खान यांचा युटर्न; बाजवांवर फोडलं बदनामीचं खापर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2023 10:46 PM2023-02-12T22:46:07+5:302023-02-12T22:47:35+5:30

इम्रान खान यांनी पाकिस्तानमध्ये वाढत्या दहशतवादी घटनांसाठी पाकिस्तानी लष्कर जबाबदार असल्याचं म्हटलं. 

I am not anti American pakistan former pm Imran Khan s U turn targeted general Qamar Javed Bajwa | Imran Khan Pakistan : “मी अमेरिका विरोधी नाही,” इम्रान खान यांचा युटर्न; बाजवांवर फोडलं बदनामीचं खापर

Imran Khan Pakistan : “मी अमेरिका विरोधी नाही,” इम्रान खान यांचा युटर्न; बाजवांवर फोडलं बदनामीचं खापर

Next

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी अमेरिकेच्या विरोधावर यू-टर्न घेतला आहे. आपण अमेरिकाविरोधी नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी आपण अमेरिकाविरोधी असल्याचं अमेरिकन लोकांना सांगितलं होतं, असा आरोप इम्रान खान यांनी केला. आंतरराष्ट्रीय संबंध वैयक्तिक अहंकारावर आधारित नसावेत. इथूनच आपल्याबद्दल खोटं पसरवलं गेलं, ते अमेरिकेतून पाकिस्तानात पसरवण्यात आलं नव्हतं. आता या सर्व गोष्टी जुन्या झाल्या असून पुढे जायचं आहे, असं वक्तव्य इम्रान खान यांनी केलं.

एप्रिल २०२२ मध्ये पाकिस्तानच्या पंतप्रधानपदावरून पायउतार झाल्यानंतरच इम्रान खान यांनी अमेरिकेवर आरोप करण्यास सुरुवात केली. पाकिस्तानच्या राजकारणात परकीय हस्तक्षेपाचा पुरावा त्यांच्याकडे असल्याचा दावा त्यांनी सार्वजनिक रॅलीत कागदोपत्री केला. अमेरिकेनं पाकिस्तानच्या राजदूतांना बोलावून त्यांना सत्तेवरून हटवण्याची घाई केल्याचा दावाही इम्रान खान यांनी केला होता. विरोधी पक्षांच्या आघाडी सरकारलाही त्यांनी आयात म्हटलं होतं. मात्र, अमेरिकेने हे आरोप फेटाळून लावले होते.

हल्ल्यांसाठी लष्कर जबाबदार
शनिवारी प्रसारित व्हॉइस ऑफ अमेरिका इंग्रजीला दिलेल्या मुलाखतीत इम्रान खान यांनी देशातील वाढत्या दहशतवादाच्या घटनांसाठी पाकिस्तानी लष्कर आणि गुप्तचर संस्था आयएसआयच्या निष्काळजीपणाला जबाबदार धरलं. बंदी घातलेल्या तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) सोबत चर्चा करण्याच्या पीटीआय सरकारच्या निर्णयावर नुकत्याच झालेल्या टीकेवरही इम्रा खान यांनी भाष्य केलं. टीटीपीशी चर्चेचे संकेत देण्याच्या तुमच्या निर्णयावर तुम्ही ठाम आहात का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. याला प्रत्युत्तर देताना इम्रान खान म्हणाले की, त्यावेळी कोणतेही पर्याय नव्हते. सर्वांच्या संमतीनं आम्ही चर्चा करण्याचं ठरवलं होतं.

टीटीपीवरून लष्करावर हल्लाबोल
पाकिस्तानातील टीटीपीच्या दहशतवादी कारवायांसाठी इम्रान खान यांनी पाकिस्तानी लष्कर आणि गुप्तचर संस्थेला जबाबदार धरले. टीटीपी पुन्हा संघटित होत असल्याचं ते म्हणाले. पण तेव्हा पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणा कुठे होते? गुप्तचर यंत्रणा कुठे होत्या? तो त्यांना पुन्हा एकत्र येण्यापासून रोखू शकला नसता का? त्यांच्या निष्काळजीपणासाठी आम्हाला कसे जबाबदार धरता येईल, असे सवालही त्यांनी केले. गेल्या काही महिन्यांपासून देशातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती ढासळली असून, दहशतवादी संघटना जवळपास निर्भयपणे देशभर हल्ले करत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Web Title: I am not anti American pakistan former pm Imran Khan s U turn targeted general Qamar Javed Bajwa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.