मी ‘लष्कर-ए-तोयबा’चा समर्थक : परवेझ मुशर्रफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 06:15 AM2017-11-30T06:15:47+5:302017-11-30T06:16:13+5:30
लष्कर-ए-तोयबा आणि त्याचा संस्थापक हाफिज सईदचे आपण सर्वात मोठे समर्थक असल्याचे पाकिस्तानचे माजी हुकूमशाह परवेज मुशर्रफ (७४) यांनी म्हटले आहे.
कराची / दुबई : लष्कर-ए-तोयबा आणि त्याचा संस्थापक हाफिज सईदचे आपण सर्वात मोठे समर्थक असल्याचे पाकिस्तानचे माजी हुकूमशाह परवेज मुशर्रफ (७४) यांनी म्हटले आहे. काश्मिरात भारतीय सैन्याकडून दडपशाही सुरू असून त्या विरोधात लढणाºया अतिरेकी संघटनांच्या भूमिकेचे आपण समर्थन करतो, असेही ते म्हणाले.
सईद ज्या प्रकारे काश्मीरशी संलग्न आहे, त्याचे मी समर्थन करतो. अलीकडेच मुशर्रफ यांनी २३ पक्षांची आघाडी केली आहे. जम्मू-काश्मिरात भारतीय सैन्याची दडपशाही करत असल्याचा आरोप ते सातत्याने करीत आले आहेत.
ं‘जमात-उद-दावा’ मला मान्य\
ते म्हणाले की, लष्कर-ए-तोयबा सर्वात मोठी ताकद आहे. सईदची दहशतवादी संघटना ‘जमात-उद-दावा’ मला मान्य आहे. तोयबावर पाकिस्तानात बंदी आहे आणि मुशर्रफ सरकारनेच हा निर्णय घेतला होता. याविषयी विचारता ते म्हणाले की, संघटनेवर बंदी आणली होती तेव्हाची ‘परिस्थिती’वेगळी होती.