'भारताचा आदर्श समोर ठेवा' असं म्हणालोच नाही, पाकिस्तान लष्करप्रमुखांची पलटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2017 01:17 PM2017-02-20T13:17:46+5:302017-02-20T13:25:33+5:30
पाकिस्तानने भारताचा आदर्श समोर ठेवला पाहिजे असं म्हणलोच नसल्याचा दावा पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमार बाजवा यांनी केला आहे
Next
ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. 20 - पाकिस्तानने भारताचा आदर्श समोर ठेवला पाहिजे असं म्हणलोच नसल्याचा दावा पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमार बाजवा यांनी केला आहे. काही दिवसांपुर्वी पाकिस्तानमधील प्रसारमाध्यमांनी कमार बाजवांनी वक्तव्य केल्याचं वृत्त दिलं होतं. मात्र लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी ट्विट करत ही माहिती चुकीची असल्याचं सांगितलं आहे.
लष्करप्रमुखांनी रावळपिंडीत अधिका-यांशी संवाद साधताना केलेल्या वक्तव्य यासंबंधीच्या बातम्या आणि प्रतिक्रिया चुकीच्या असल्याचं त्यांनी ट्विटमध्ये सांगितलं आहे.
News / comments quoting COAS' address to officers at Rawalpindi regarding book 'Army and Nation' is a disinformation. pic.twitter.com/vR8sjDIyw1
— Maj Gen Asif Ghafoor (@OfficialDGISPR) February 19, 2017
गेल्याच आठवड्यात पाकिस्तानधील वृत्तपत्र नेशनने यासंबंधी वृत्त देताना डिसेंबरमध्ये बाजवा यांची अधिका-यांसोबत बैठक झाली असल्याचं सांगितलं आहे. 'लष्कराला सरकारमध्ये हस्तक्षेप करत सरकार चालवण्याचा काहीच अधिकार नाही. भारतात लष्कराच्या हस्तक्षेपाशिवाय लोकशाही व्यवस्था सुरळीत चालू आहे असून त्यांना ते योग्यप्रकारे जमलं आहे', असं लष्करप्रमुख कमार बाजवा यावेळी बोलल्याच या वृतात सांगण्यात आलं होतं.
तसंच या बैठकीत लष्करप्रमुख कमार बाजवा यांनी अधिका-यांनी 'आर्मी अॅण्ड नेशन' हे पुस्तक वाचण्याचं आवाहनदेखील केलं. या पुस्तकात भारतात लोकशाही का यशस्वी ठरली यासंबंधी लिहिण्यात आलं आहे. मात्र प्रवक्ते आसिफ गफूर यांनी हे वृत्त फेटाळलं आहे.
या वृत्तामुळे पाकिस्तानला चांगलाच धक्का बसला होता. पाकिस्तानमध्ये आतापर्यंत तीन वेळा पाकिस्तानने सत्ता आपल्या हाती घेतली असताना लष्करप्रमुखांचं हे वक्तव्य त्यांच्यासाठी खूपच धक्कादायक आणि आश्चर्यकारक होतं.