'देश सोडायचा नव्हता, पण...', सीरिया सोडल्यानंतर असद यांची पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 21:35 IST2024-12-16T21:31:52+5:302024-12-16T21:35:51+5:30

बंडखोरांनी राजधानाची ताबा घेतल्यानंतर सीरियाचे पदच्युत राष्ट्राध्यक्ष बशर-अल-असद देश सोडून पळून गेले.

'I didn't want to leave the country, but...', Bashar Al-Assad's first reaction after leaving Syria | 'देश सोडायचा नव्हता, पण...', सीरिया सोडल्यानंतर असद यांची पहिली प्रतिक्रिया

'देश सोडायचा नव्हता, पण...', सीरिया सोडल्यानंतर असद यांची पहिली प्रतिक्रिया

Bashar Al-Assad: सीरियातील सत्तांतरानंतर देश सोडून पळून गेलेले राष्ट्राध्यक्ष बशर-अल-असद यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. 'देश सोडण्याचा कधीही विचार केला नव्हता', अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच, आता सीरिया दहशतवाद्यांचा हातात गेला, असेही ते म्हणाले.

सीरियातून पळून गेल्यानंतर पहिल्यांदा प्रतिक्रिया देताना बशर अल-असद म्हणाले की, दमास्कसच्या पतनानंतर देश सोडण्याचा कोणताही विचार नव्हता, परंतु दहशतवाद्यांनी हल्ला केल्यामुळे माझ्यासमोर कुठलाही पर्याय उरला नाही. 8 डिसेंबर रोजी सकाळी राजधानीवर हल्ला झाला आणि त्या दिवशी सायंकाळपर्यंत मी तिथेच माझी कामे करत होतो. सीरियातून निघून जाण्याचा विचार केला नव्हता, पण रशियन सैन्याने मला आणि माझ्या कुटुंबाला तेथून बाहेर काढले. 

बशर अल-असद 2000 मध्ये सत्तेवर आले
वडील हाफेज अल-असाद यांच्यानंतर, बशर अल-असद 2000 साली सत्तेवर आले होते. कुटुंबाने तीन दशके सीरियावर राज्य केले. असाद यांना एकेकाळी अजिंक्य मानले जात होते, परंतु हयात तहरीर अल-शाम (HTS), ज्याला पूर्वी अल-नुसरा फ्रंट म्हणून ओळखले जाते, या संघटनेने 8 डिसेंबर रोजी असद यांची राजवट पाडली. सध्या बशर अल असद रशियात असून, तिथे आपल्या कुटुंबासह सुरक्षित आहेत.

Web Title: 'I didn't want to leave the country, but...', Bashar Al-Assad's first reaction after leaving Syria

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.