माझ्यावर आयएसच्या किती जणांनी बलात्कार, केला माहीत नाही
By admin | Published: September 17, 2016 03:21 AM2016-09-17T03:21:46+5:302016-09-17T10:57:19+5:30
इस्लामिक स्टेटच्या (आयएस) अतिरेक्यांनी आॅगस्ट २०१४ मध्ये अपहरण केलेल्या नादिया मुराद हिने त्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये स्व:ची कशीबशी सुटका करून घेतली.
न्यूयॉर्क : इस्लामिक स्टेटच्या (आयएस) अतिरेक्यांनी आॅगस्ट २०१४ मध्ये अपहरण केलेल्या नादिया मुराद हिने त्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये स्व:ची कशीबशी सुटका करून घेतली. या साधारण तीन महिन्यांत नादियाने नरक अनुभवला, अनेकांकडून झालेले बलात्कार सोसले, मारहाण सहन केली. आता ती म्हणते की त्या अतिरेक्यांना शिक्षा झाल्याशिवाय मला न्याय मिळणार नाही.
ब्रिटनचे पंतप्रधान टोनी ब्लेअर यांनी इराकशी युद्ध करण्याचा निर्णय घेतला त्यावर्षी नादिया आठ वर्षांची होती. त्या युद्धाने इराक अस्थिर झाला व त्याची खूप हानी झाली व याच वातावरणात इस्लामिक स्टेट शक्तिशाली बनली. या युद्धाने नादियाला काय दिले हे बघण्यासाठी टोनी ब्लेअर यांनी तिला भेटले पाहिजे. इराकशी झालेल्या युद्धामुळे नादियाला शारीरिक आणि मानसिक यातना काय काय भोगाव्या लागल्या हे त्यांना समजेल.
इराकमधील अत्यंत पुरातन अशा याझिदी समाजाचा इस्लामिक स्टेट अत्यंत द्वेष करते. आॅगस्ट २०१४ मध्ये तिचे या अतिरेक्यांनी अपहरण केले. माझ्यावर किती लोकांनी बलात्कार केला हे मला सांगताही येणार नाही, असे ती म्हणते. त्या लोकांशी लढण्याचे मी लवकरच थांबविले व मला दुसऱ्याच एका जगात प्रवेश करावा लागला. तेथे माझ्यावर बलात्कार झाले.
नादियासह पाच हजार महिलांना पळवले होते
याझिदीतून आयएसने आॅगस्ट २०१४ मध्ये नादियासह पाच हजार महिलांना पळवून नेले होते. याझिदी समाज हा इस्लाम आणि ख्रिश्चॅनिटी अशा दोन्ही धर्मांपासून अस्तित्वात आलेला. परंतु उत्तर सिरिया, उत्तर इराक आणि पूर्व तुर्कीमध्ये त्यांना सैतानाचे उपासक समजले जाते. नादियाच्या डोळ््यांदेखत तिच्या सहा भावांना व आर्ईला ठार मारण्यात आले. त्याच दिवशी तिच्या खेड्यातील ३०० लोकांना ठार मारले गेले.
नादिया, तिच्या बहिणी, तिच्या चुलत बहिणी, भाच्या अशांचा इस्लामिक स्टेटच्या अतिरेक्यांशी जबरदस्तीने ‘विवाह’ लावण्यात आले. ज्या पुरुषांनी नादियावर बलात्कार केला त्यांनी कधीही स्व:ची ओळख पटू दिली नाही. तीन महिन्यांनंतर नादियाने स्व:ची सुटका करून घेतली. आपण पकडले गेलो तर आपल्याला ठार मारले जाईल हे तिला माहीत होते. आता तिने जर्मनीमध्ये आश्रय घेतला आहे.