पराभव मी कदाचित स्वीकारणारही नाही : ट्रम्प

By Admin | Published: October 21, 2016 03:19 AM2016-10-21T03:19:03+5:302016-10-21T03:19:03+5:30

अध्यक्षपदाची निवडणूक ही ‘गैरमार्गाने’ ताब्यात घेण्यात आली असल्याचे म्हणणारे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीतील पराभव मी कदाचित स्विकारणार नाही

I might not even accept defeat: Trump | पराभव मी कदाचित स्वीकारणारही नाही : ट्रम्प

पराभव मी कदाचित स्वीकारणारही नाही : ट्रम्प

googlenewsNext

लास वेगास : अध्यक्षपदाची निवडणूक ही ‘गैरमार्गाने’ ताब्यात घेण्यात आली असल्याचे म्हणणारे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीतील पराभव मी कदाचित स्विकारणार नाही, असे धक्कादायक विधान गुरुवारी केले. ट्रम्प यांच्या प्रतिस्पर्धी हिलरी क्लिंटन यांनी निवडणुकीचा निकाल नाकारण्याचा ट्रम्प यांचा विचार हा ‘भयानक’ असून ट्रम्प हे रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतिन यांच्या हातातील बाहुले असल्याचा आरोप केला.

मी आठ
नोव्हेंबरपर्यंत निवडणुकीचा
निकाल स्विकारण्यावरील रहस्य कायम ठेवील. मी त्याकडे (निकाल) तेव्हाच बघेन. मी आता त्याकडे बघत नाही आहे.

ताज्या वादविवादामध्ये क्लिंटन या चांगले म्हणता येतील अशा


13%
गुणांची आघाडी घेऊन विजयी झाल्या, असे सीएनएनने म्हटले.

हा वादविवाद ज्यांनी बघितला त्यांच्यापैखी
५२ टक्के प्रेक्षकांनी क्लिंटन यांनी जबाबदारी चांगली पार पाडल्याचे म्हटले तर ट्रम्प विजयी झाल्याचे ३९ टक्क्यांचे मत आहे, असे सीएनएनने घेतलेल्या अशास्त्रीय मतदानात म्हटले.

क्लिंटन यांनी अध्यक्षीय वादविवादांच्या तिन्ही फेऱ्या जिंकल्या परंतु क्लिंटन यांचा तिसऱ्या आणि अंतिम वादविवादातील विजय आक्रसला. त्यांनी पहिला वादविवाद ३५ गुणांनी तर २३ गुणांनी दुसरा वादविवाद जिंकला होता.

90मिनिटे चाललेल्या या वादविवादात ट्रम्प यांनी ही निवडणूक ‘गैरमार्गाने’ मिळवल्याचा पुन्हा एकदा आरोप केला. प्रसार माध्यमे ही प्रामाणिक नाहीत व भ्रष्टाचारी आहेत, असे ते म्हणाल्याचे न्यूयॉर्क टाईम्स’ने लिहिलेल्या लेखात म्हटले आहे.

आमची लोकशाही अशा पद्धतीने काम करीत नाही. २४० वर्षांपासून ती असून निवडणुका खुल्या आणि न्याय वातावरणात झाल्या आहेत, असे हिलरी क्लिंटन म्हणाल्या. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन मतदार हा सगळे काही तपासून बघण्याइतका सुज्ञ असल्याचे म्हटले.

लोकशाही परंपरेला तडा जाण्याची भीती
अमेरिकेमध्ये सत्तेचे हस्तांतर खूप सहजपणे होण्याच्या लोकशाही परंपरेला यामुळे तडा जाण्याची भीती ट्रम्प यांच्या वक्तव्यामुळे व्यक्त होत आहे.

शेवटच्या फेरीत क्लिंटन विजयी
या निवडणुकीतील शेवटच्या अध्यक्षीय वादविवाद फेरीत युनिव्हर्सिटी आॅफ नेवादामध्ये ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन समोरासमोर आले. या फेरीत क्लिंटन विजयी झाल्याचे जाहीर झाले.

फॉक्स न्यूजचे ख्रिस वॉलॅस यांनी सत्तेचे हस्तांतरण
हे पराभूत उमेदवाराने निवडणुकीच्या निकालाची वैधता स्विकारण्यावर अवलंबून असते, असे म्हटल्यानंतर ट्रम्प यांनी वरील विधान केले.

Web Title: I might not even accept defeat: Trump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.