"मी माझं कौमार्य एका फिल्मस्टारला १८ कोटींना विकलं’’, तरुणीने केला सनसनाटी दावा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 15:06 IST2025-03-10T15:05:29+5:302025-03-10T15:06:41+5:30

International News: मी माझं कौमार्य एका फिल्मस्टारला तब्बल १८ कोटी रुपयांना विकल्याचा सनसनाटी दावा एका तरुणीने केला आहे.

"I sold my virginity to a film star for 18 crores", the young woman made a sensational claim | "मी माझं कौमार्य एका फिल्मस्टारला १८ कोटींना विकलं’’, तरुणीने केला सनसनाटी दावा  

"मी माझं कौमार्य एका फिल्मस्टारला १८ कोटींना विकलं’’, तरुणीने केला सनसनाटी दावा  

मी माझं कौमार्य एका फिल्मस्टारला तब्बल १८ कोटी रुपयांना विकल्याचा सनसनाटी दावा एका तरुणीने केला आहे. या २२ वर्षीय तरुणीने चक्क तिचं कौर्माय विकण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी तिने एस्कॉर्ट्सशी संपर्क साधला. तसेच त्यांना आपल्या निर्णयाबाबत सांगितले. तसेच कौमार्य विकत घेण्यासाठी कुणी खरेदीदार असतील तर सांगण्यास सांगितले. त्यानंतर तिच्याकडे खरेदीदारांची रांग लागली. अखेरीस लिलाव करून तिच्या कौमार्याची विक्री करण्यात आली. त्यात एका हॉलिवूड अभिनेत्याने बोली जिंकली. 

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार मॅन्चेस्टरमध्ये राहणाऱ्या लॉरा हिने डिसेंबर महिन्यात आपलं कौमार्य विकण्याचा निर्णय घेतला होता. काही महिन्यांनंतर तिच्या कौमार्याचा लिलाव करण्यात आला. त्यावेळी एका प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्याने १.७ दशलक्ष पौंड्स म्हणजेच १८ कोटी रुपये एवढी बोली लावून तिचं कौमार्य विकत घेतलं. या लिलावामध्ये लंडनमधील एक नेता आणि दुबईमधील एका व्यावसायिकानेही सहभाग घेतला होता. अखेरीस त्यात हॉलिवूड अभिनेत्याने बाजी मारली.

बोली लावल्यानंतर एस्कॉर्ट्ससोबत मिळून एक तारीख निश्चित करण्यात आली. त्या दिवशी लॉरा ही त्या हॉलिवूड अभिनेत्याला एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये  भेटायला गेली. तसेच आपल्या मनात याबाबत कुठलीही भीती नव्हती, तर मी उत्साही होते. या निर्णयाबाबत मी समाधानी आहे, तसेच माझ्या मनात कुठलाही पश्चाताप नाही, असे तिने सांगितले. ती पुढे म्हणाली की, जर मी कौमार्य न विकता कुणासोबतही संबंध प्रस्थापित केले असते तर कदाचित त्या व्यक्तीने माझ्यासोबत विवाह केला नसता. त्यामुळे मी घेतलेला निर्णय हा योग्यच आहे. सुरुवातीला या निर्णयामुळे माझ्या आई-वडिलांना धक्का बसला होता. मात्र नंतर ते यासाठी तयार झाले, असेहीत तिने सांगितले.  

Web Title: "I sold my virginity to a film star for 18 crores", the young woman made a sensational claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.