ही संपूर्ण जागा भारतीयांनी भरलेली; बंदूक घेऊन त्यांचे तुकडे करेन; कपड्यावरील मजकुरानं खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 06:09 PM2021-09-24T18:09:36+5:302021-09-24T18:17:28+5:30
ब्रँडविरोधात चीनमध्येच नाराजी; नागरिकांच्या बहिष्कार अस्रामुळे माफी मागण्याची नामुष्की
बीजिंग: सीमावर्ती भागात सातत्यानं कुरघोड्या करणारा चीन आता वेगळ्या मार्गानं भारतद्वेष पसरवू लागला आहे. चीनमधला प्रसिद्ध JNBY ब्रँड भारताविरोधात कपड्यांच्या माध्यमातून द्वेष पसरवत आहे. लहान मुलांसाठी कपडे तयार करणाऱ्या या ब्रँडच्या अनेक उत्पादनांवर चिथावणीखोर आणि हिंसक मजकूर छापण्यात आला आहे. त्यामुळेच चीनमध्येही JNBYला विरोध झाला आहे. चिनी नागरिकांनी बहिष्काराचं अस्र उगारल्यानं JNBYनं माफी मागितली.
'संपूर्ण जागा भारतीयांनी भरलेली आहे. मी ही बंदूक घेऊन त्यांचे तुकडे-तुकडे करेन,' असा मजकूर JNBY नं तयार केलेल्या एका कपड्यावर इंग्रजी भाषेत छापण्यात आला आहे. दुसऱ्या एका कपड्यावर एका मुलाचं कार्टून छापण्यात आलं आहे. त्या मुलाच्या शरीरात असंख्य बाण घुसल्याचं दिसत आहे. 'नरकात स्वागत आहे', अशा आशयाचा मजकूरदेखील छापण्यात आला आहे.
व्यंकटेश अय्यर मुंबईला धू धू धुत असताना आईला आली टॅक्सी चालकाची आठवण; नेमकं काय आहे प्रकरण?
JNBY नं डिझाईन केलेल्या कपड्यांवर चीनमध्ये प्रचंड टीका झाली आहे. चिनी सोशल मीडिया विवोवर लाखो लोकांनी JNBY विरोधात आवाज उठवला आहे. या कपड्यांवर 'मला तुम्हाला स्पर्श करू द्या', अशा आक्षेपार्ह मजकूरदेखील छापला गेला आहे. अशा प्रकारचा मजकूर कपड्यावर छापून JNBY चिनी मुलांच्या भविष्यावर विपरित परिणाम करत असल्याचा आक्षेप पालकांनी नोंदवला आहे. चीनमधल्या सरकारी माध्यमांनीदेखील या कपड्यांवरील मजकूराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.