इब्राहिम इस्कंदर मलेशियाचे नवे सुल्तान; अब्जाधीशांनाही लाजवेल अशी संपत्ती...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2024 03:33 PM2024-02-01T15:33:12+5:302024-02-01T15:33:54+5:30
इस्कंदर हे अब्जाधीश जरी असले तरी ते जनतेला भेटण्यासाठी दरवर्षी मोटारसायकलवरून आपल्या भागात फिरतात.
मलेशियामध्ये नव्या राजाची निवड झाली आहे. जोहोर राज्याचे इब्राहिम इस्कंदर यांना पुढील पाच वर्षांसाठी सुल्तान बनविण्यात आले आहे. बुधवारी त्यांनी देशाच्या १७ व्या राजाच्या स्वरुपात शपथ घेतली. ब्रिटिशांनी स्वातंत्र्य दिल्यानंतर १९५७ पासून मलेशियात दर पाच वर्षांनी राजाची निवड केली जाते.
इस्कंदर हे अब्जाधीश जरी असले तरी ते जनतेला भेटण्यासाठी दरवर्षी मोटारसायकलवरून आपल्या भागात फिरतात. शपथविधीपूर्वी सुलतान इस्कंदर यांनी खासगी जेटने क्वालालंपूरला निघाले होते. सुलतान इस्कंदर राजघराण्यातील आहेत. त्यांचा मोठा मुलगा मलेशियाचा क्राउन प्रिन्स टुंकू इस्माईल हे सैन्यात कॅप्टन होता.
नव्या सुल्तानाकडे एकूण 47.33 लाख कोटी रुपयांची संपत्ती आहे. तसेच ३०० गाड्यांचा ताफाही आहे. खाजगी सैन्यासह एक प्रशस्त विमान व इतर अनेक जेट आहेत. इस्कंदर यांची सिंगापूरमध्येही जमीन देखील आहे. या जमिनीचा दर चार अब्ज डॉलर्स असल्याचे सांगितले जाते. रिअल इस्टेट, खाणकामापासून पाम तेलापर्यंतच्या व्यवसायातही भागीदारी देखील आहे.
मलेशियामध्ये एकूण 13 राज्ये आणि नऊ राजघराणी आहेत. राजा होण्यासाठी एक गुप्त मतपत्रिका असते, ज्यामध्ये बॅलेट पेपरचा वापर केला जातो. बॅलेट पेपरमध्ये राजा बनणाऱ्या व्यक्तीचे नाव असते आणि नामनिर्देशित व्यक्ती राजा बनण्यास सक्षम आहे की नाही हे प्रत्येक राजघराण्याने सांगणे आवश्यक आहे.