अपहृत मुलींची ओळख पटली चित्रफितीवरुन पालकानी शोधल्या आपल्या मुली

By admin | Published: May 13, 2014 07:00 PM2014-05-13T19:00:41+5:302014-05-14T00:25:29+5:30

नायजेरियातील शाळेतून अपहरण करण्यात आलेल्या २०० हून अधिक मुलींची चित्रफीत बोको हरामने प्रसिद्ध केल्यानंतर, पालक आपापल्या मुलींना शोधत असून, त्यापैकी काही मुलींची ओळख पटल्याचे सांगण्यात येत आहे.

Identified with kidnapped girls, parents discovered their daughters | अपहृत मुलींची ओळख पटली चित्रफितीवरुन पालकानी शोधल्या आपल्या मुली

अपहृत मुलींची ओळख पटली चित्रफितीवरुन पालकानी शोधल्या आपल्या मुली

Next

लागोस- नायजेरियातील शाळेतून अपहरण करण्यात आलेल्या २०० हून अधिक मुलींची चित्रफीत बोको हरामने प्रसिद्ध केल्यानंतर, पालक आपापल्या मुलींना शोधत असून, त्यापैकी काही मुलींची ओळख पटल्याचे सांगण्यात येत आहे. २७६ मुलींचे अपहरण करण्यात आले असून, त्यातील १३० मुलींचे धर्मांतरण करून त्यांना मुस्लिम बनविण्यात आले आहे. ज्या मुलींचे धर्मांतर झालेले नाही, त्या मुली तुरुंगात असणार्‍या दहशतवाद्यांच्या बदल्यात दिल्या जातील असे बोको हरामने म्हटले आहे. नायजेरिया सरकारने प्रथम दहशतवाद्यांना सोडण्यास नकार दिला होता, पण आता सरकार सर्व पर्यायावर विचार चालू असल्याचे सांगत आहे. दरम्यान, या मुलींचा शोध घेण्यासाठी अमेरिकेने टेहळणी विमाने तैनात केली आहेत.
चित्रफितीचे २७ मिनिटांचे फूटेज चिबॉकमधील लोकांना सोमवारी सायंकाळी दाखविण्यात आले. फूटेजमध्ये दिसणार्‍या सर्व मुली चिबॉकच्या नाहीत. कारण एप्रिल महिन्यात मुलींची शाळेतील अंतिम वर्षाची परीक्षा होती. त्या परीक्षेसाठी आजुबाजूच्या गावातूनही मुली या शाळेत आल्या होत्या. मुलींच्या मैत्रिणींनी चित्रफितीतील तीन मुलींना ओळखले आहे. एका आईनेही हिजाब घातलेल्या आपल्या मुलीला ओळखले आहे. अपहरण झालेल्या बहुतांश मुली ख्रिश्चन आहेत, त्यांना इस्लाम धर्म स्वीकारावा लागला आहे.
बोको हरामचा नेता अबूबकर शेकाऊ याने तुरुंगातील सहकार्‍यांच्या बदल्यात मुली सोडण्याचा प्रस्ताव मांडला आहे. जोपर्यंत तुम्ही आमच्या मित्रांची सुटका करणार नाही, तोपर्यंत मुली तुम्हाला पुन्हा दिसणार नाहीत असा इशारा त्याने दिला आहे. मुलींच्या सुटकेसाठी सर्व पर्यायांवर विचार चालू असल्याचे नायजेरियन सरकारने म्हटले आहे, गेल्या आठवड्यात मुलींना गुलाम म्हणून विकून टाकले जाईल, असे अबूबकरने म्हटले आहे. नायजेरियात मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ जमले असल्याने या मुलींच्या सुटकेबद्दल वाटाघाटी केल्या जाण्याची शक्यता आहे. बोको हरामचा मुलींना पाश्चात्त्य शिक्षण देण्यास विरोध आहे. या मुली शाळेत नको होत्या, त्यांचे लग्न व्हायला हवे होते असे या संघटनेचे म्हणणे आहे.

Web Title: Identified with kidnapped girls, parents discovered their daughters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.