27 ऑक्टोबरला निवडणुका झाल्या असत्या तर मी राष्ट्रपती असती- हिलरी क्लिंटन
By admin | Published: May 3, 2017 04:47 PM2017-05-03T16:47:49+5:302017-05-03T16:47:49+5:30
अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन यांनी गेल्या वर्षी 8 नोव्हेंबर रोजी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेल्या पराभवास
Next
>ऑनलाइन लोकमत
न्यू यॉर्क, दि. 3 - अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन यांनी गेल्या वर्षी 8 नोव्हेंबर रोजी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेल्या पराभवास अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा(एफबीआय), विकिलीक्स आणि रशीयाच्या हॅकर्सना जबाबदार धरलं आहे. न्यू यॉर्कमध्ये ‘वुमन फॉर वुमन इंटरनेशनल फोरम’ या कार्यक्रमात सीएनएनला दिलेल्या एका मुलाखतीत त्या बोलत होत्या.
जर 27 ऑक्टोबरला निवडणुका झाल्या असत्या तर मी तुमची राष्ट्रपती असती. पण असं झालं नाही. 28 ऑक्टोबरला एफबीआयचे संचालक जिम कॉमेचं पत्र आणि रशिया विकिलीक्सच्या मेलने जे लोक मला मतदान करणार होते, त्या लोकांच्या मनात माझ्याबद्दल या लोकांनी संशय निर्माण केला. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या तुलनेत मी 30 लाख मते जास्त घेतली होती. परंतु, नंतर इलेक्टोरेल मतदानात ट्रम्प विजयी झाले.
प्रचारादरम्यान माझ्या वैयक्तिक इ-मेल्स हॅकिंगमागे रशियाची भूमिका आणि विकिलिक्सने एकामागोमाग माझ्याबाबतचे प्रकरणं सादर करण्याच्या वेळेत साधर्म्य असल्याबाबतही हिलरी यांनी शंका व्यक्त केली.
पुन्हा निवडणूक लढवणार नाही-
डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून झालेल्या पराभवानंतर हिलरी पुन्हा कोणतीही निवडणूक लढवणार नाही. न्यूयॉर्कच्या महापौरपदाच्या निवडणुकीत हिलरी उतरू शकतात असं वृत्त मध्यंतरी आलं होतं त्यावर मूळ भारतीय असलेल्या त्यांच्या सहकारी नीरा टंडन यांनी हिलरी पुन्हा कोणतीही निवडणूक लढवणार नाही.