"मी राजकारणात आल्यास तिस-या महायुद्धाला कारण ठरेन"
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 03:55 PM2018-10-10T15:55:56+5:302018-10-10T15:56:12+5:30
मूळच्या भारतीय वंशाच्या असलेल्या आणि अमेरिकेचं नागरिकत्व स्वीकारलेल्या पॅप्सिको कंपनीच्या माजी अध्यक्षा इंद्रा नुई यांनी राजकारणावर भाष्य केलं आहे.
वॉशिंग्टन- मूळच्या भारतीय वंशाच्या असलेल्या आणि अमेरिकेचं नागरिकत्व स्वीकारलेल्या पॅप्सिको कंपनीच्या माजी अध्यक्षा इंद्रा नुई यांनी राजकारणावर भाष्य केलं आहे. मी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कॅबिनेटमध्ये सहभागी झाले असते, तर तिस-या महायुद्धाला निमित्त ठरले असते, असं विधान इंद्रा नुई यांनी केलं आहे.
मी स्पष्टवादी असल्यानं असं सांगतेय. एका कार्यक्रमात नुई यांना विचारण्यात आलं की, तुम्हाला ट्रम्प कॅबिनेटमध्ये सामील होण्याची इच्छा आहे. त्यावर त्या म्हणाल्या, मला आणि राजकारणाला दोघांनाही एकत्र करू नका. मी खूपच स्पष्टवक्ती आहे. मला कूटनीती जमत नाही. कूटनीती काय असतं हे मला माहीत नाही. असं करू नका अन्यथा मी तिस-या महायुद्धाला कारण ठरेन, असं त्या म्हणाल्या आहेत.
कोण आहेत इंद्रा नुई ?
तामिळनाडूतल्या चेन्नईमध्ये इंद्रा नुई यांचा 28 ऑक्टोबरला जन्म झाला. मूळच्या भारतीय वंशाच्या असलेल्या इंद्रा नुई यांनी अमेरिकेचं नागरिकत्व स्वीकारलं आहे. 12 वर्षं त्या पेप्सिको कंपनीच्या सीईओपदी होत्या. 2 ऑक्टोबरला त्यांनी या पदाचा राजीनामा दिला आहे. फोर्ब्स मासिकाच्या जगातील 100 शक्तिशाली महिलांच्या यादीत इंद्रा नुई यांना 2008 साली तेराव्या क्रमांकावर स्थान मिळाले होते.