मी राष्ट्राध्यक्षाची निवडणूक हरलो तर...; डोनाल्ड ट्रम्प यांना सतावतेय भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2020 08:24 AM2020-06-14T08:24:52+5:302020-06-14T08:24:52+5:30

कोरोनामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला झालेल्या नुकसानीमुळे चार कोटींपेक्षा जास्त लोक बेरोजगार झाले आहेत.

If I lose the presidential election ...; Donald Trump told what will he doing first | मी राष्ट्राध्यक्षाची निवडणूक हरलो तर...; डोनाल्ड ट्रम्प यांना सतावतेय भीती

मी राष्ट्राध्यक्षाची निवडणूक हरलो तर...; डोनाल्ड ट्रम्प यांना सतावतेय भीती

Next

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या निवडणुकीमुळे तणावात आहेत. यामुळे त्यांनी पुन्हा एकदा अमेरिकेला धमकी देऊन टाकली आहे. जर मी निवडणूक हरलो तर अमेरिकेसाठी वाईट असेल, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच हरल्यानंतर काय करणार हे देखील त्यांनी सांगितले आहे. 


ट्रम्प यांच्या कार्यपद्धतीमुळे नागरिकांमध्ये असलेली नाराजी, कोरोनामुळे होणारे हजारो मृत्यू आणि नुकतीच श्वेतवर्णीय जॉर्ज फ्लॉईडच्या अमानुष हत्येमुळे सुरु असलेले हिंसक आंदोलन येती राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक सोपी नसल्याचे दिसत आहे. यामुळे ट्रम्प यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोद यांनी ट्रम्प यांच्यासाठी मोठे कार्यक्रमही घेतले होते. 


जर डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्रपती निवडणूक हरले तर ते स्वेच्छेने ऑफिस खाली करणार नाहीत, असे बोलले जात होते. मात्र, यावर ट्रम्प यांनी सांगितले की, मी हरल्यानंतर चूपचाप ऑफिसमधून निघून जाईन. शुक्रवारी फॉक्स न्य़ूज चॅनेलवरील एका इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी यावर खुलासा केला. यामध्ये त्यांनी जर मी निवडणूक हरलो तर मला वाटते की ही हार देशासाठी खूप वाईट गोष्ट असेल, असे म्हटले. 


येत्या राष्ट्राध्यक्ष निव़डणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात डेमोक्रेटीक पक्षाचे उमेदवार आणि माजी उपराष्ट्राध्यक्ष जो बिडेन हे निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ शांततेचा आणि समृद्धीचा राहिला आहे. मात्र, कोरोना व्हायरस महामारीमुळे अमेरिकेतील मृत्यूंचा आकडा लाखावर गेला आहे. तसेच गेल्या आठवड्यात झालेला हिंसाचारही ट्रम्प यांच्या कारकिर्दीला डाग लावून गेला आहे. यामुळे त्यांची खूर्ची धोक्यात असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. 


एवढेच नाही तर कोरोनामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला झालेल्या नुकसानीमुळे चार कोटींपेक्षा जास्त लोक बेरोजगार झाले आहेत. तसेच वादग्रस्त वक्तव्यांनी अमेरिकेच्या संसदेलाच अनेकदा धमक्या दिल्याने त्यांची प्रतिमा मलिन झाली आहे. वर्षभरापूर्वी त्यांच्याकडील पूर्वाश्रमीच्या हाऊसकिपिंग करणाऱ्या महिलेने लैंगिक छळ केल्याचा आरोप केल्याने खळबळ उडाली होती. रशियासोबत असलेले व्यापारी संबंधही त्यांना नेहमी वादात ओढत राहिलेले आहेत. 

Web Title: If I lose the presidential election ...; Donald Trump told what will he doing first

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.