पुलवामा हल्ल्याचा निषेध नाहीच, उलट इम्रान खान यांनी भारतालाच दिली धमकी!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 01:50 PM2019-02-19T13:50:14+5:302019-02-19T14:10:13+5:30
पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर गप्प बसलेले पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अखेर या प्रकरणावरील आपले मौन सोडले.
इस्लामाबाद - पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर सोईस्कर मौन बाळगून बसलेले पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अखेर या प्रकरणावरील आपले मौन सोडले. मात्र पुलवामा हल्ल्याचा साधा निषेध नोंदवण्यापेक्षा इम्रान खान यांनी भारतालाच धमकावण्याचा प्रयत्न केला. भारतात सध्या निवडणुकीचे वातावरण आहे. त्यामुळे पाकिस्तानवर हल्ला झाल्यास राजकीय लाभ मिळू शकतो. मात्र पाकिस्तानवर हल्ला केला तर पाकिस्तानही त्याला प्रत्युत्तर देईल, अशी धमकी इम्रान खान यांनी दिली.
पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर चौफेर दबाव आला असून, भारताकडूनही आक्रमक कारवाईसाठी मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर या प्रकरणी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी बाळगलेले मौन सोडत आज देशाला संबोधित केले. या संबोधनामध्ये इम्रान खान यांनी पुलवामा हल्लात पाकिस्तानचा हात असल्याचा दावा फेटाळून लावला.
ते म्हणाले की, पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवला पाहिजे. पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइक केली पाहिजे, अशा चर्चा सुरू आहेत. चालू वर्ष हे भारतामध्ये निवडणुकीचे वर्ष आहे. त्यामुळे पाकिस्तानवर हल्ला केल्यास सत्ताधाऱ्यांना राजकीय फायदा होऊ शकतो. भारताने हल्ला केला, तर पाकिस्तान शांत बसेल अशा भ्रमात राहू नका, हल्ला झाला तर पाकिस्तानही त्याला प्रत्युत्तर देईल. तसेच एकदा युद्ध सुरू झाले की ते थांबवणे कुणाच्याही हातात नसेल.''
Pakistan PM Imran Khan: If you (Indian govt) thinks you will attack us and we will not think of retaliating, we will retaliate. We all know starting a war is in the hands of humans, where it will lead us only God knows. This issue should be solved through dialogue. pic.twitter.com/kbyvmAiJgk
— ANI (@ANI) February 19, 2019
पुलवामा हल्ला घडवून आणणारा दहशतवादी हा काश्मिरी तरुण होता. त्यावरूनही इम्राना खान यांनी भारताला घेरण्याचा प्रयत्न केला. ''काश्मीरमधील तरुण हे मरण्यासाठी का तयार होत आहेत. आत्मघाती हल्लेखोर का बनत आहेत, याचा विचार भारताने केला पाहिजे. तसेच कुठलाही प्रश्न हा चर्चेच्या माध्यमातूनच सुटू शकतो. अफगाणिसत्नमध्ये 17 वर्षांच्या लढाईनंतर चर्चेस सुरुवात झाली आहे, याचे उदाहरण देत इम्रान खान यांनी चर्चेचेही आवाहन केले.
Pakistan PM Imran Khan's statement on #Pulwama terrorist attack: Pakistan ko isse kya faayda hai? Kyu Pakistan karega iss stage ke upar jab Pakistan stability ki taraf ja raha hai? pic.twitter.com/Z1rdaIbTcJ
— ANI (@ANI) February 19, 2019
पुलवामा हल्ल्यानंतर हा हल्ला पाकिस्ताननेच केला आहे, असा आरोप भारताने केला आहे. मात्र भारत सरकार कुठल्याही पुराव्याशिवाय पाकिस्तानवर आरोप करत आहे, असा प्रत्यारोप इम्रान खान यांनी केला.
Pakistan PM Imran Khan's statement on #Pulwama terrorist attack: My statement is for the Indian government. You (Indian govt) have blamed the Pakistan government without any evidence. (file pic) pic.twitter.com/yOVFFamT28
— ANI (@ANI) February 19, 2019