नावात बदल झाला तर जुना ग्राह्य व्हिसा फुकट जातो का?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2017 04:22 PM2017-12-04T16:22:44+5:302017-12-04T16:24:01+5:30
माझं या वर्षी लग्न झालं आणि नवीन पासपोर्टवर माझं बदललेलं नाव आहे. माझ्याकडे ग्राह्य असलेला व्हिसा जुन्या पासपोर्टमध्ये आहे, ज्यात माझं माहेरचं नाव आहे. अमेरिकेत जाण्यासाठी मला नवीन व्हिसा लागेल का?
प्रश्न - माझं या वर्षी लग्न झालं आणि नवीन पासपोर्टवर माझं बदललेलं नाव आहे. माझ्याकडे ग्राह्य असलेला व्हिसा जुन्या पासपोर्टमध्ये आहे, ज्यात माझं माहेरचं नाव आहे. अमेरिकेत जाण्यासाठी मला नवीन व्हिसा लागेल का?
उत्तर - नाही, तुम्हाला नवीन व्हिसा घेण्याची गरज नाहीये. तुम्ही तुमचा अजून ग्राह्य असलेला व्हिसा अमेरिकेत प्रवास करण्यासाठी वापरू शकता. अर्थात, ज्यावेळी तुम्ही अमेरिकेत प्रवास कराल, तुम्ही तुमचा जुना पासपोर्ट, ज्यामध्ये ग्राह्य असलेला व्हिसा आहे, तो जवळ बाळगला पाहिजे. तसेच, इंग्रजीमध्ये भाषांतर केलेलं लग्नाचं प्रमाणपत्र व नवीन पासपोर्टही सोबत बाळगावा. त्यामुळे अमेरिकेमध्ये प्रवेश करताना, अधिकाऱ्यांना नावात बदल का आहे, हे सांगता येईल. इमिग्रेशन करणारा अधिकारी तुमच्या जुन्यचा पासपोर्टमधील ग्राह्य असलेला व्हिसा तपासेल, आणि नवीन पासपोर्टमध्ये शिक्का मारून तुम्हाला प्रवेश देईल.
लग्नाव्यतिरिक्त अन्य कारणांसाठी ज्यांनी नावामध्ये बदल केला आहे, त्यांनी नावात बदल करण्यासंदर्भातील कायदेशीर कागदपत्रे सोबत बाळगावीत. काही उदाहरणं म्हणजे, नावात बदल केलेले करार, कोर्ट ऑर्डर, गॅझेट नोटिफिकेशन, प्रतिज्ञापत्र इत्यादी. वेगळी जी काही कागदपत्रे तुम्ही जोडाल, त्यांचं इंग्रजीतलं भाषांतर सोबत असावं.
त्यामुळे नावात बदल असेल तर नवीन व्हिसासाठी अर्ज करावा लागतोच असं काही नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, जुन्या पासपोर्टमधून व्हिसा काढून नवीन पासपोर्टमध्ये चिकटवण्याचा प्रयत्न करू नका. असं केलंत, तर तो व्हिसा अग्राह्य ठरेल, आणि अमेरिकेत प्रवेशासाठी तो व्हिसा कुचकामी ठरेल.