"अण्वस्त्रांचा वापर केला तर जगाच्य नकाशावरून पुसून टाकू"! या देशाची हुकूमशहा किम जोंगला थेट धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 04:01 PM2024-07-16T16:01:42+5:302024-07-16T16:02:31+5:30
या दोन्ही देशांमध्ये गेल्या काही काळापासून सातत्याने धमक्यांचे सत्र सुरू आहे...
दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया यांच्यातील तणाव सातत्याने वाढताना दिसत आहे. आता दक्षिण कोरियानेउत्तर कोरियाला जगाच्या नकाशावरून पुसून टाकण्याची धमकी दिली आहे. उत्तर कोरियाने अण्वस्त्रे वापरण्याचा विचार केला, तर त्यांना नकाशावरून पुसून टाकू, असे दक्षिण कोरियाने म्हटले आहे. खरे तर, दक्षिण कोरियाने दिलेली धमकी काही नवीन नाहीत. या दोन्ही देशांमध्ये गेल्या काही काळापासून सातत्याने धमक्यांचे सत्र सुरू आहे...
खरे तर, अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडेन आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती यूं सुक येओल यांनी उत्तर कोरियाच्या वाढत्या अण्वस्त्रसाठ्याचा सामना करण्यासाठी गुरुवारी संयुक्त आण्विक प्रतिबंधक मार्गदर्शक तत्त्वांवर स्वाक्षरी केली. या करारांतर्गत दक्षिण कोरियाची क्षमता वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. या करारानंतर उत्तर कोरियाकडून प्रत्युत्तरही देण्यात आले आहे. यात, अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांच्यातील या कराराचा प्रथम निषेध करण्यात आला. तसे, सियोल आणि वॉशिंग्टनला याची मोठी किंमत मोजावी लागेल, असेही म्हणण्यात आले आहे. याशिवाय हे चिथावणीखोर कृत्य असल्याचेही उत्तर कोरियाने म्हटले आहे.
किम जोंगच्या धमकीनंतर दक्षिण कोरीयानेही दिली धमकी -
किम जोंगकडून मोठी किंमत मोजावी लागण्याची धमकी दिल्यानंतर दक्षिण कोरियाने ही त्यांना धमकी दिली आहे. जर उत्तर कोरियाने अण्वस्त्रे वापरली, तर त्याला नष्ट करू, असे दक्षिण कोरियाने म्हटले आहे. दक्षिण कोरियाच्या संरक्षण मंत्रालयाने धमकी देत म्हटले आहे की, अण्वस्त्र हल्ला केल्यानंतर उत्तर कोरिया वाचू शकेल, अशी कुठलीही शक्यता नाही. आता उत्तर कोरियाकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहावे लागेल.