खराब झालेल्या पासपोर्ट मध्ये युएसचा ग्राह्य व्हिसा असेल, तर नवीन व्हिसा लागेल का
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2017 03:00 PM2017-09-25T15:00:54+5:302017-09-25T15:01:43+5:30
जोपर्यंत व्हिसाची मुदत संपत नाही तोपर्यंत तुम्हाला नवीन व्हिसासाठी अर्ज करण्याची आवश्यकता नाही. तुमचा पासपोर्ट खराब झालेला असेल तर तुम्हाला विदेशा जाण्यासाठी नवीन पासपोर्ट काढावाच लागेल
प्रश्न - जर माझा जुना पासपोर्ट खराब झाला आहे आणि त्यातच माझा अमेरिकेचा व्हिसा पण असेल तर नवीन पासपोर्टसाठी अर्ज करताना नवीन युएस व्हिसासाठी देखील अर्ज करावा लागेल का?
उत्तर - नाही, जोपर्यंत व्हिसाची मुदत संपत नाही तोपर्यंत तुम्हाला नवीन व्हिसासाठी अर्ज करण्याची आवश्यकता नाही. तुमचा पासपोर्ट खराब झालेला असेल तर तुम्हाला विदेशा जाण्यासाठी नवीन पासपोर्ट काढावाच लागेल. ज्यावेळी कधी तुम्ही अमेरिकेला जाणार असाल, त्यावेळी तुम्ही जुना आणि नवीन असे दोन्ही पासपोर्ट जवळ बाळगा. नवीन चांगला पासपोर्ट आणि खराब झालेला जुना पासपोर्ट ज्यामध्ये सध्याचा तुमचा उपयोगात असलेला व्हिसा आहे.
जर तुमच्या पासपोर्टची मुदत संपली असेल आणि त्यामध्ये उपयोगी असलेला अमेरिकेचा व्हिसा असेल तरीही हीच बाब लागू पडते. व्हिसावर लिहिलेल्या मुदतीपर्यंत तो ग्राह्य असतो. त्यामुळे मुदत संपलेला पासपोर्ट ज्यामध्ये युएस व्हिसा आहे आणि नवीन पासपोर्ट असे दोन्ही जवळ बाळगा.
अर्थात, एक लक्षात ठेवा की जर तुमचा अमेरिकेचा व्हिसाच खराब झाला असेल तर मात्र तुम्हाला प्रवासापूर्वी नवीन व्हिसासाठी अर्ज करावा लागेल. अमेरिकेमध्ये जाण्यासाठी तुम्हाला ग्राह्य व सुस्थितीतील पासपोर्ट लागतो आणि तसेच ग्राह्य व सुस्थितीतील व्हिसा लागतो.