कोरोनाची लागण झाली आहे की नाही?; आता फोनवर शिंकल्यास ६० सेकंदात मिळणार माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 08:36 PM2020-05-19T20:36:27+5:302020-05-20T13:52:49+5:30
आतापर्यत जगभरात ४८ लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.
नवी दिल्ली: जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यत जगभरात ४८ लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर कोरोना व्हायरसमुळे जगभरात ३२०,१२१ लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा धोका कसा कमी करता येईल यासाठी विविध उपययोजना सर्व देशांतील सरकारकडून करण्यात येत आहे.
कोरोनासारख्या संकटावर मात करण्यासाठी अनेक देशांतील संशोधकांकडून लसीचे संशोधन करण्यात येत आहे. मात्र यामध्ये अजूनही यश आलेलं नाही. परंतु आता कोरोनाची लागण झाली आहे की नाही याबाबत आता तुम्हाला ६० सेकंदात माहिती मिळणार आहे.
अमेरिकेतील एका संशोधनाच्या टीमकडून दावा करण्यात येत आहे की, मोबाइलवर शिंकल्यास किंवा खोकलल्यानंतर तुम्हाला कोरोनाची लागण झाली आहे की नाही याबाबत ६० सेकंदात माहिती मिळणार आहे. याबाबत आम्ही मोबाईलला कोरोनाबाबतच एक सेन्सर जोळता येईल की नाही यावर काम सुरु आहे. तसेच आगमी ३ महिन्यात हा मोबाईल बाजारातपेठेत उपलब्ध होईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे.
या प्रोजेक्टमधील प्राध्यापक मसूद तबीब अजहर यांनी सांगितले की, कोरोनाबाबत माहिती देणाऱ्या या डिव्हाइसचा प्रोटोटाइप १ इंच रुंद असणार आहे. हा डिव्हाइस वायरलेस ब्लूटूथद्वारे कोणत्याही स्मार्टफोनला जोडू शकतो. या डिव्हाइसद्वारे खोकल्यास किंवा शिंकल्यास सेन्सरचा कलर बदलेल आणि व्हिज्युअल्सप्रमाणे तुम्हाला कोरोनाची लागण झाली आहे की नाही याबाबत माहिती मिळणार आहे, असं मसूद तबीब अजहर यांनी सांगितले.
"दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी फडणवीसांनी केलं होतं मिरची हवन"
कोरोनासंदर्भात विरोधकांची मोठी बैठक; उद्धव ठाकरे अन् ममतांसह 15 पक्षाचे नेते होणार सहभागी
मोदींना पत्र लिहिणाऱ्या पवारांनी उद्धव ठाकरेंनाही पत्र पाठवावं; फडणवीसांचा टोला
उमेदवारीवरुन एकनाथ खडसेंनी केलेल्या टीकेवर गोपीचंद पडळकर म्हणतात...